महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
Default Image चर्चेची बातमी पोलिस टाइम्स

अंमली पदार्थ बाळगणाऱ्या त्रिकुटाला बाजारपेठ पोलीसांनी ठोकल्या बेड्या

कल्याण प्रतिनिधी – प्रतिबंधित अंमली पदार्थ विक्रीकरिता बाळगणाऱ्या त्रिकुटाच्या कल्याणच्या बाजारपेठ पोलीसांनी मुसक्या आवळल्या आहेत. याप्रकरणी अटक केलेल्या तीन आरोपींकडून ५४ ग्राम वजनाचे ८१ हजार किमतीची एम.डी.पावडर जप्त केली असल्याची माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त अनिल पोवार यांनी दिली.

मंगळवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास बाजारपेठ पोलीस ठाण्याचे व.पो.नि यशवंत चव्हाण यांना त्यांच्या  गुप्त बातमीदारा मार्फत कल्याण पश्चिमेतील भोईवाडा, एम.एस.ई.बी. ऑफिस जवळ एम.डी.पावडर (मेफेड्रॉन) नावाच्या अंमली पदार्थाची विक्री करण्याकरीता येणार असल्याची माहिती मिळाली होती. मिळालेल्या माहितीनुसार बाजारपेठ पोलिसांनी सापळा रचला. ७ एप्रिलला रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास एक ऑटो रिक्षा बैल बजार चौकाकडुन मुर्गी मोहल्ला कडे जाणार रोडने येतांना दिसली. हि रिक्षा एम.एस.ई.बी. कार्यालयासमोर आल्यावर या रिक्षातुन तीन इसम खाली उतरले. त्यावेळी बातमीदाराने या तीन इसमांना पाहुन पोलीसांनी सांगितल्याप्रमाणे इशारा करून हेच ते एम. डी.पावडर नावाचा अंमली पदार्थ विकी करण्यासाठी येणारे इसम असल्याचे सांगितले.

 त्याप्रमाणे लगेचच या तिघांना जागीच घेराव घालून रात्री अडीच वाजता ताब्यात घेण्यात आले. मेहदी मनवर मजिद (२४) वर्षे, इस्माईल उर्फ बोरी अब्बास गाडीवाला (३५), शहबाज गुलाम मुस्तफा शेख (२९) वर्षे, अशी त्यांची नावं असुन, त्यांच्या पैकी इस्माईल उर्फ बोरी अब्बास गाडीवाला याच्याकडून २७ हजार किंमतीचे १८ ग्रॅम व मेहदी मनवर मजिद याच्या ताब्यातून ५४ हजार किंमतीचे ३६ ग्रॅम वजनाची  असा एकुण ८१ हजार रुपये किंमतीची ५४ ग्रॅम वजनाची एम.डी.पावडर (मेफेड्रॉन) नावाचे अंमली पदार्थ मिळून आले आहेत. तर आरोपी शहबाज गुलाम मुस्तफा शेख यांच्या ताब्यातून एक ऑटो रिक्षा, ३ मोबाईल व रोख रक्कम असा एकुण १ लाख ४९ हजार ३७० रुपये  किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

हि कारवाई पोलीस निरीक्षक राजेंद्र अहिरे, गुन्हे प्रकटीकरण पथकाचे प्रभारी स.पो.नि. प्रमोद सानप, पोहवा. टी के पावशे, यु. व्ही. सावत, पोना. बी.आर. बागुल, पोना. जी एन पोटे, पी.एम. बाविस्कर, पोकॉ  राजाराम सांगळे यांनी केली असल्याची माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त अनिल पोवार यांनी दिली.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »