महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
ठाणे न्युजरूम

डोंबिवलीत मनसेच्या स्वाक्षरी मोहिमेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेसाठी जनजागृती

DESK MARATHI NEWS NETWORK
डोंबिवली/प्रतिनिधी -निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता राखावी आणि लोकशाहीचे रक्षण व्हावे, या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या  माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात राज्यस्तरीय स्वाक्षरी मोहीम राबविण्यात येत आहे. – या मोहिमेला डोंबिवलीत नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. इंदिरा गांधी चौक येथे आयोजित करण्यात आलेल्या या मोहिमेत नागरिकांनी स्वाक्षरी करून आपल्या मागण्यांना पाठिंबा दर्शविला.
मनसेचे नेते राजू पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली डोंबिवली शहराच्या वतीने या स्वाक्षरी मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. निवडणूक प्रक्रियेबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करणे, मतदारांचा मतदानाचा हक्क सुरक्षित ठेवणे आणि निवडणूक प्रक्रिया अधिक पारदर्शक करण्याच्या मागण्यांसाठी ही मोहीम राबविण्यात येत आहे.
या मोहिमेच्या माध्यमातून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा घेण्यात यावा, SIR अंतर्गत राबविण्यात आलेली प्रक्रिया रद्द करावी, तसेच मतदान प्रक्रिया बॅलेट पेपरवर राबविण्यात यावी, अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत. याशिवाय EVM मतदान यंत्रांबाबत उपस्थित होणाऱ्या शंकांचे निरसन करावे आणि स्वच्छ, अचूक व पारदर्शक मतदार यादी तयार करावी, अशीही मागणी मनसेकडून करण्यात येत आहे.

इंदिरा गांधी चौकात आयोजित या मोहिमेदरम्यान नागरिकांनी स्वाक्षरी करून निवडणूक सुधारणांच्या मागण्यांना समर्थन दिले. या उपक्रमात मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
लोकशाही व्यवस्थेवरील जनतेचा विश्वास अधिक दृढ व्हावा, प्रत्येक पात्र मतदाराचा मतदानाचा हक्क सुरक्षित राहावा आणि निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेबाबत उपस्थित होणाऱ्या प्रश्नांची उत्तरे मिळावीत, हा या मोहिमेमागील प्रमुख उद्देश असल्याचे मनसेच्या वतीने सांगण्यात आले.
लोकशाहीच्या रक्षणासाठी जनतेचा आवाज बुलंद करूया, असा संदेश देत डोंबिवलीतील या स्वाक्षरी मोहिमेच्या माध्यमातून मनसेने निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आणला आहे

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »