महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
इतर

हाथरस प्रकरणातील दोषींना तात्काळ फाशी द्या,करमाळा राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी

प्रतिनिधी.

करमाळा – हाथरस बलात्कार प्रकरणातील दोषींना तात्काळ फाशी द्या अशी मागणी करमाळा राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे.यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवन्यात आले आहे.
सदर निवेदनात पुढं म्हटले आहे की,उत्तरप्रदेशात हाथरस येथे अल्पवयीन मागासवर्गीय मुलीवर काही नराधमांनी सामूहिक बलात्कार करून जीभ कापून टाकली आहे. त्यात तिचा जीव गेला आहे. पोलिसांनीही तिचा मृतदेह तिच्या नातेवाईकांच्या ताब्यात न देता परस्पर अंत्यसंस्कार केले आहेत.

हे सर्व संशयास्पद आहे. हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न अधिकारी वर्गाकडून झाल्याची शक्यता आहे त्यामुळे यामध्ये अडकलेल्या सर्व नराधमांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली आहे.सदर निवेदनावर राष्ट्रवादी काँग्रेस पदवीधर संघाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य नितीनभाऊ झिंजाडे,राष्ट्रवादी काँग्रेस करमाळा विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष भोजराज सुरवसे,सामाजिक न्याय विभागाचे तालुकाध्यक्ष शिवाजी जाधव, राष्ट्रवादी ओबीसी सेलचे तालुकाध्यक्ष दत्तात्रय अडसूळ, युवा नेते आशपाक जामदार, युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष महेश काळे पाटील,शहर उपाध्यक्ष केतन कांबळे,चंद्रकांत जगदाळे, सामाजिक न्याय विभागाचे तालुका कार्याध्यक्ष अविनाश वाघमारे,शहर कार्याध्यक्ष ओंकार पलंगे,सिध्दांत कांबळे,ओम कांबळे हे उपस्थित होते.

देशातील विविध राज्यात बलत्कारांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.महिला,मुलींच्या संरक्षणाच्या बाबतीत केंद्र सरकार गंभीर नाही.बलात्कारासारख्या दुर्दैवी घटना रोखण्यासाठी सरकारने त्वरित पावले उचलावीत.

Related Posts
Translate »