महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
पोलिस टाइम्स लोकप्रिय बातम्या

एफएसएसएआय अधिकारी लाचखोरी प्रकरण, सीबीआयला सापडले कोटी रुपयांचे घबाड

नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.

मुंबई/प्रतिनिधी – भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (एफएसएसएआय)च्या  मुंबई येथील प्रादेशिक कार्यालयाचे  सहाय्यक संचालक (एडी) आणि  ठाणे येथील एका खाजगी कंपनीच्या वरिष्ठ व्यवस्थापकाशी संबंधित लाचखोरीच्या प्रकरणाच्या चालू असलेल्या तपासा  केंद्रीय अन्वेषण ब्युरो (सीबीआय) ने अंदाजे 1,42,70,000 रुपये रोख  रक्कम, दोन सोन्याची बिस्किटे, एक लॅपटॉप व गुन्ह्याशी संबंधित इतर कागदपत्रे  शोध मोहिमेदरम्यान केलेल्या  कारवाईत हस्तगत केली.

सीबीआयने 04.05.2024 रोजी एफएसएसएआय मुंबई येथील प्रादेशिक कार्यालयाच्या सहाय्यक संचालक (तांत्रिक) सह दोन खाजगी व्यक्ती म्हणजे ठाणे स्थित खाजगी कंपनीचे संचालक आणि एक वरिष्ठ व्यवस्थापक, ती खाजगी कंपनी आणि इतर अज्ञात व्यक्ती अशा आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला.यात  असे आरोप करण्यात आले होते की, एफएसएसएआय मुंबई येथील प्रादेशिक कार्यालयाचा सहाय्यक संचालक   अनेक मध्यस्थांच्या संगनमताने, सार्वजनिक सेवक या नात्याने सार्वजनिक कर्तव्य पार पाडण्यात अप्रामाणिकपणा करत अन्न पदार्थ व्यवसायिक  आणि इतर इच्छुकांकडून लाच मागणे आणि स्वीकारणे या बेकायदेशीर आणि भ्रष्ट पद्धतींमध्ये गुंतलेला आहे.

आरोपी  एफएसएसएआयचा सहाय्यक संचालक  खाजगी कंपनीच्या आरोपी वरिष्ठ व्यवस्थापकाकडून लाच घेत होता. त्या कंपनीच्या संचालकाच्या वतीने त्यांची प्रलंबित बिले मंजूर करण्याच्या बदल्यात तो लाच देत होता असा आरोपही करण्यात आला होता.

त्यानंतर सीबीआयने सापळा रचला आणि आरोपी सहायक संचालक(एफएसएसएआय) याला  वरिष्ठ व्यवस्थापक आणि खाजगी कंपनीच्या अन्य प्रतिनिधीकडून  1,20,000 रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले. लाचेच्या पैशांची देवाणघेवाण करणाऱ्या तीनही आरोपींना अटक करण्यात आली. त्यानंतर खासगी कंपनीच्या आरोपी संचालकालाही अटक करण्यात आली.

यापूर्वी आरोपींच्या कार्यालयात व निवासी परिसरात झडती घेतली असता अंदाजे 37.3 लाख रुपये  रोख, सुमारे 45 ग्रॅम सोने आणि विविध स्थावर मालमत्तेशी संबंधित कागदपत्रे आणि इतर संबंधित कागदपत्रे जप्त करण्यात आली. आजच्या  सापळ्यानंतर सीबीआयने केलेल्या विविध शोध मोहिमांमध्ये जप्त केलेल्या मुद्देमालाची  सोने/सोन्याच्या बिस्किटांसह अंदाजे किंमत 1.8 कोटी रुपयापर्यंत पोहोचली आहे.

Related Posts
Translate »