महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
चर्चेची बातमी पोलिस टाइम्स

पाच गर्लफ्रेंडच्या मौजे साठी बनला मोबाईल चोर, पोलिसांनी ठोकल्या बेड्या

प्रतिनिधी.

कल्याण – कल्याण पश्चिमेतील वालधूनी परिसरात एका तरुणाचा मोबाईल हिसकावून चोरट्यांनी पळ काढल्याची घटना सीसीटीइव्हीत कैद झाली होती. या सीसीटीव्हीच्या सहाय्याने कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांनी तपास सुरु केला. एसीपी अनिल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरिक्षक नारायण बनकर यांनी पोलीस पथक तयार केले. आणि मोठ्या शिताफीने मोबाईल चोराला गजाआड केले आहे  पाच प्रियाशीची हौसमौज करण्यासाठी मोबाईल चोर बनला होता मात्र त्याचे कृत्य सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाल्याने त्याच्या मुसक्या आवळल्यात पोलिसांना मदत झाली 

        या घटनेचा तपास पोलीस अधिकारी प्रकाश पाटील यांच्याकडे दिला गेला. अखेर पोलिसांना तपासात यश आले. भिवंडी येथील नांदेडकरमध्ये राहणारा मोबाईल चोरटा निखील ठाकरे याला अटक करण्यात आली. त्याच्याकडून पोलिसांनी दहा मोबाईल हस्तगत केले. कल्याणमधील तीन घटना उघडकीस आल्या आहेत. अन्य मोबाईल याने कुठून चोरले आहे. याचा तपास सुरु आहे. तसेच, त्याच्या एका साथीदाराचा शोध सुरु आहे.

दरम्यान चोराचा चोरी करण्याचा  उद्देश्य ऐकून पोलीस थक्क झाले , निखील याला पाच गर्लफ्रेंड आहेत. तो प्रत्येक गर्लफ्रेंडची हौस भागवतो. त्याच्याकडे खूप पैसा आहे. हे दाखविण्यासाठी निखीलने मोबाईल चोरीचा धंदा सुरु केला होता. पोलिसांनी त्याचा मुसक्या आवळल्या आहेत. या सबोतच महात्मा फुले पोलिसांनी दुसऱ्या प्रकरणातील दोन मोबाईल चोरटे अविनाश विठ्ठल आणि एका अल्पवयीन मुलाला अटक करुन त्याच्यांकडूनही मोबाईल हस्तगत केले आहेत.

Related Posts
Translate »