महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
चर्चेची बातमी देश

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने ओटीटी प्लॅटफॉर्म्सच्या १९ वेबसाईट्स,१० ऍप्स, ५७ सोशल मिडिया हँडल्स केले ब्लॉक

नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.

नवी दिल्ली/प्रतिनिधी – अश्लील, असभ्य आणि काही प्रकरणात पोर्नोग्राफिक आशयाचे प्रसारण करणाऱ्या 18 ओटीटी प्लॅटफॉर्म्सवर माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने(I&B) विविध मध्यस्थांच्या समन्वयाने कारवाई केली आहे. या प्लॅटफॉर्म्सशी संबंधित असलेल्या 19 वेबसाईट्स, 10 ऍप्स (गुगल प्ले स्टोअरवरील 7, ऍपल ऍप स्टोअरवरील 3) आणि 57 सोशल मीडिया अकाऊंट्स भारतात वापरण्यासाठी निष्क्रीय करण्यात आली आहेत. माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी वारंवार यावर भर दिला आहे की ‘सर्जनशील अभिव्यक्ती’ च्या नावाखाली अश्लील, असभ्य आणि गैरवर्तनाचा प्रसार होणार नाही यांची जबाबदारी या प्लॅटफॉर्म्सची आहे. 12 मार्च, 2024 रोजी ठाकूर यांनी अश्लील आणि असभ्य आशयाचे प्रसारण करणारे 18 ओटीटी प्लॅटफॉर्म्स बंद करत असल्याची घोषणा केली.  माहिती तंत्रज्ञान कायदा, 2000 मधील तरतुदींअंतर्गत भारत सरकारची इतर मंत्रालये/विभाग आणि प्रसारमाध्यम आणि मनोरंजन, महिलांचे अधिकार आणि बालकांचे अधिकार या क्षेत्रातील तज्ञ यांच्याशी सल्लामसलत करून अलीकडेच हा निर्णय घेण्यात आला.

List of OTT Platforms

Dreams FilmsVooviYessmaUncut AddaTri FlicksX Prime
Neon X VIPBesharamsHuntersRabbitXtramoodNuefliks
MoodXMojflixHot Shots VIPFugiChikooflixPrime Play

आशयाचे स्वरुप
या प्लॅटफॉर्म्सवरून प्रसारित होत असलेले बहुतेक कार्यक्रम अश्लील, असभ्य आणि महिलांचे अशोभनीय पद्धतीचे चित्रण करणारे असल्याचे आढळले. यामध्ये नग्नता आणि शिक्षक आणि विद्यार्थ्यांमधील अनैतिक नातेसंबंध, अनैतिक कौटुंबिक नातेसंबंध इ. सारख्या अनुचित संबंधांमध्ये लैंगिक कृतींच्या चित्रिकरणाचा समावेश होता.
यावरील आशयांमध्ये कोणत्याही संदर्भाविना किंवा सामाजिक प्रासंगिकतेविना लैंगिकता आणि प्रदीर्घ लांबीची पोर्नोग्राफिक आणि लैंगिकतेवर आधारित दृश्यांचा समावेश होता.
आयटी कायद्याचे कलम 67 आणि 67ए, कलम 292 आणि महिलांचे अशोभनीय प्रदर्शन (प्रतिबंध) कायदा, 1986 चे कलम 4 चे हे आशय उल्लंघन करत असल्याचे प्रथमदर्शनी निश्चित झाले आहे.  
लक्षणीय दर्शकसंख्या
या ओटीटी ऍप्सपैकी एकावर गुगल प्लेस्टोअरवर एक कोटी डाऊनलोड्सची तर इतर दोनवर 50 लाख डाऊनलोड्सची नोंद झाली आहे. त्याव्यतिरिक्त या ओटीटी प्लॅटफॉर्म्सनी त्यांचे ट्रेलर्स, विशिष्ट दृश्यांचा प्रसार करण्यासाठी सोशल मीडियाचा आणि त्यांच्या वेबसाईट आणि ऍप्सकडे प्रेक्षकांना आकर्षित करण्यासाठी एक्स्टर्नल लिंक्सचा अतिशय मोठ्या प्रमाणात वापर केला आहे. संबंधित ओटीटी प्लॅटफॉर्म्सच्या सोशल मीडिया अकाउंट्सची संचित सदस्य संख्या 32 लाखांवर पोहोचली आहे. 

Social Media PlatformNumber of Accounts
Facebook12
Instagram17
X (formerly Twitter)16
YouTube12


ओटीटी प्लॅटफॉम्ससोबत सातत्याने संपर्क
माहिती तंत्रज्ञान नियम, 2021 अंतर्गत स्थापन झालेले ओटीटी प्लॅटफॉर्म्स आणि त्यांच्या स्वयं – नियामक संस्थांसोबत माहिती आणि प्रसारण मंत्रालय बैठका, वेबिनार, कार्यशाळा इत्यादींच्या माध्यमातून सातत्याने जबाबदारीचे भान निर्माण करण्याचा प्रयत्न करत असते. ओटीटी उद्योगाची वृद्धी आणि विकासाला चालना देण्यासाठी भारत सरकार वचनबद्ध आहे. या संदर्भात 54व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात वेब सीरीजसाठी पुरस्कार देण्याची सुरुवात, माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रातील ओटीटी प्लॅटफॉर्म्ससोबत सहकार्य आणि आयटी नियम, 2021 अंतर्गत स्वयं नियमनावर भर देत सौम्य नियामक चौकटीची स्थापना यांसह अनेक उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. 

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »