नेशन न्यूज मराठी टीम.
नागपूर/प्रतिनिधी – बौद्ध धम्म क्रांतीच्या ६७ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिवसाचा मुख्य कार्यक्रम आज सकाळ पासून नागपुरातील दीक्षाभूमी येथे साजरा होत आहे. देश-विदेशातील आंबेडकर अनुयायी दीक्षाभूमीमध्ये दाखल होत आहेत. विजयादशमी दिनाच्या निमित्ताने दीक्षाभूमीवर ६७ वा धम्मचक्र प्रवर्तन दिवस साजरा होत आहे.
यानिमित्ताने श्रीलंका, म्यानमार, जपानसह अनेक बौद्ध राष्ट्र तसेच देशातील विविध राज्यांतील लोक नागपुरात दाखल होत आहेत. लाखो बौद्ध व आंबेडकर अनुयायींची होणारी गर्दी लक्षात घेता प्रशासनाने तयारी केली आहे. विद्युत रोषणाईने दीक्षाभूमीला सजवण्यात आले आहे. सुरक्षा बंदोबस्तापासून स्वच्छता, आरोग्य, वाहतूक सेवांसह अन्य सुविधा उपलब्ध केल्या आहेत. दीक्षाभूमी परिसराला पंचशीलच्या ध्वजांनी सजवले गेले आहे.धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त अनुयायांची दीक्षाभूमीवर तुफान गर्दी आहे.