नेशन न्यूज मराठी टीम.
नांदेड / प्रतिनिधी – राज्य सरकारने कंत्राटी नोकर पद भरतीचा जी आर काढल्या प्रकरणी वंचित चे कार्यकर्ते देखील आक्रमक पवित्रा घेताना दिसले. वंचित बहुजन युवा आघाडी नांदेड दक्षिणच्या वतीने शासकीय विश्रामगृह नांदेड येथे बैठक संपन्न झाली. या बैठकीत नोकऱ्यांचे खाजगीकरण कंत्राट भरती , शासकीय शाळा खाजगीकरण विरोधात तीव्र निदर्शने करण्यात यावे असे आवाहन करण्यात आले. 5 ऑक्टोबर 2023 रोजी शासनाच्या विरोधात महात्मा फुले पुतळा आयटीआय कॉर्नर नांदेड येथे आंदोलन करण्यात येणार आहे.
या आंदोलनास सर्व विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे असे वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने आवाहन करण्यात आले. या बैठकीला वंचित बहुजन युवा आघाडीचे महाराष्ट्र प्रदेश सदस्य अक्षय बनसोडे, जिल्हाध्यक्ष धीरज हाके, प्रसिद्धीप्रमुख अमोल भारतीय व इतर पदाधिकारी उपस्थित होते.



