नेशन न्यूज मराठी टिम.
बीड/प्रतिनिधी – राज्यात वॉन्टेड असणारा आणि बीड जिल्ह्यात 25 गुन्हे दाखल असलेला गुन्हेगार आटल्या भोसलेसह इतर दोन साथीदाराला बीड पोलिसांनी जेरबंद केल आहे. गंभीर गुन्हे दाखल असलेल्या आटल्या भोसले याच्यावर राज्यात 70 पेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे राज्यातील सर्वच पोलीस त्याचा शोध घेत होते.
अनेकदा पोलिसांना गुंगारा देण्यात आटल्या भोसलेला यश मिळायचे. मात्र बीड आणि आष्टी पोलिसांनी राखीव पोलीस दलाची मदत घेऊन आटल्यासह त्याच्या दोन साथीदारांना जेरबंद केले आहे. हे सर्वजण दरोडाच्या तयारीत असतानाच बीड पोलिसांनी सापळा रचून यांना अटक केली, तर त्यांच्याकडून धारदार शस्त्र साठा देखील जप्त करण्यात आला आहे.पूढील तपास सुरू आहे.



