नेशन न्यूज मराठी टीम.
सोलापूर– पंढरपूर शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेने विविध गुन्ह्याचा तपास करीत आरोपींना अटक करण्यात यश मिळवले आहे, २०डिसेंबर रोजी आगरी धर्मशाळा येथे वसई येथील चिंतामणी माळवी यांचा ३लाख २८हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेला होता.
या प्रकरणी कसून तपास करीत पारस मेहडा (वय २० रा. बडवे चर, झोपडपट्टी, पंढरपूर) याला जेरबंद केले व मुद्देमाल जप्त करण्यात आला, तसेच सी सी टी व्ही फुटेज वरून कॉटन एक्स्पो, स्टेशन रोड येथील दुकानात ३६ हजार रुपयांची चेन चोरी उघडकीस आणून प्रिया अशोक भोसले (वय,२७ रा. मंगळवेढा) या महिला आरोपीस अटक केली. तसेच ७फेब्रुवारी रोजी देशी पिस्तूल बाळगणाऱ्या तीन आरोपींना के बी पी कॉलेज चौकातून अटक करण्यात आली. रोहित उर्फ बिल्ला सुभाष घोडके (वय २०,रा. वालचंदनगर ,ता .इंदापूर,जि. पुणे) अनिल दिलीप लवटे (वय २३,रा, मेदड ता. माळशिरस) व सोमनाथ राहुल भोसले (वय २९ ,रा दहिगाव रोड ,नातेपुते,ता .माळशिरस) या तीन युवकांना अटक करण्यात आली. याचप्रमाणे जबरी चोरी करणाऱ्या टोळीस शिताफीने पकडले.
३०जानेवारी रोजी तुषार भीमराव इंगळे (वय २६ ) हा उसाचा ट्रॅक्टर घेऊन निघाला असता लिंक रोड येथे मोटारसायकल आडवी लावून लुटण्यात आले होते. गुन्ह्यात गणेश शंकर शिंगाडे (वय २६ रा ईसबावी, पंढरपूर) व रोहित चौगुले (वय २५,रा कुंभार गल्ली पंढरपूर) या दोन जणांना अटक करण्यात आली. ३०जानेवारी रोजी राजश्री संतोष भाळवणकर (वय. ४५,रा घोंगडे गल्ली,पंढरपूर) यांचे मिनी गंठण हिसकावून पळवून नेले होते. या प्रकरणी सुरज दत्तात्रय बंदपट्टे,वय १९,राजू तिम्मा बंदपट्टे वय २२,दोघे (रा महात्मा फुले चौक ,संत पेठ पंढरपूर) यांना अटक करण्यात आली आहे



