महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
Default Image इतर मुख्य बातम्या

अनुसूचित जाती कल्याण समितीने घेतला विविध विभागांचा आढावा

बुलडाणा/प्रतिनिधी – महाराष्ट्र विधीमंडळाची अनुसूचित जाती कल्याण समितीने आज 5 ऑक्टोंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समिती सभागृहात आयोजित बैठकीत विविध विभागांचा आढावा घेतला. यावेळी व्यासपीठावर विधानसभा सदस्य तथा समितीप्रमुख  प्रणितीताई शिंदे, विधानसभा सदस्य तथा समिती सदस्य सर्वश्री यशवंत माने, लहू कानडे, लखन मलिक, सुनील कांबळे, नामदेव ससाणे, अरूण लाड, राजेश राठोड आदी उपस्थित होते. तसेच विधानमंडळ सचिवालयातील अवर सचिव प्र. श्री. खोंदले, जिल्हाधिकारी एस रामामूर्ती, कक्ष अधिकारी विनोद राठोड, सहा. कक्ष अधिकारी दत्तात्रय बेंगलवार आदीही उपस्थित होते. सभागृहात जिल्हाधिकारी एस रामामूर्ती, अप्पर जिल्हाधिकारी धनजंय गोगटे, निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते व विभागप्रमुख उपस्थित होते.

   समितीने सर्वप्रथम महावितरण कार्यालयातील अनुसूचित जाती प्रवर्गातील कर्मचाऱ्यांची बढती, पदोन्नती, अनुशेष, रिक्त पदे, बिंदुनामावली आदींचा आढावा घेतला. तसेच अनुसूचित जाती प्रवर्गाच्या लाभार्थ्यांना वीज जोडणी, वस्त्यांमध्ये लाईटची व्यवस्था, मुख्यमंत्री सौर कृषि पंप योजना, विशेष घटक योजनेच्या निधीमधून राबविण्यात येणाऱ्या योजनांचा आढावाही घेतला संबधित अधिकाऱ्यांना आवश्यक सुचना दिल्या. त्यानंतर कृषि विभागातील अनुसूचित जाती प्रवर्गातील कर्मचाऱ्यांचा भरती, अनुशेष, पदोन्नतीचा आढावा घेतला. तसेच मागासवर्गीय शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या वैयक्तीक योजना, महाडीबीटीद्वारे राबविण्यात येणाऱ्या योजना आदींचा आढावा घेत अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. त्यानंतर समितीने क्रीडा विभागातील मागासवर्गीय संस्थांना व्यायामशाळा देणे, मागासवर्गीय वस्तीत व्यायामशाळा साहित्य वाटप आदी योजनांचा आढावा घेतला. वन विभागातील अनुसूचित जाती लाभार्थ्यांच्या सोलर कुकर, कुकींग गॅस वाटप योजनेचा आढावा घेतला. सार्वजनिक बांधकाम विभागातंर्गत निर्माण करण्यात आलेल्या वसतिगृह बांधकामाचा समितीने आढावा घेत बांधकामे विहीत कालमर्यादेत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या.  बैठकीला सर्व विभागांचे विभागप्रमुख, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

महाराष्ट्र विधीमंडळाची अनुसूचित जाती कल्याण समितीने आज मोताळा तालुक्यातील  रोहीणखेड येथे  क्रीडा विभागाने ग्रामपंचायतीला दलीत वस्तीत दिलेल्या व्यायामशाळा साहित्याची पाहणी केली. तसेच ग्रामपंचायत पदाधिकारी, स्थानिक नागरिकांशी चर्चाही केली.  त्यानंतर शालीग्राम गेंदू इंगळे या रमाई घरकूल योजनेतील लाभार्थ्याचे घरकूलाची पाहणी करीत गावातील रमाई घरकूल योजनेतील प्रतीक्षा यादी संपविण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. यावेळी समिती प्रमुख विधानसभा सदस्य तथा समितीप्रमुख  प्रणितीताई शिंदे, विधानसभा सदस्य तथा समिती सदस्य सर्वश्री यशवंत माने, लखन मलिक, सुनील कांबळे, नामदेव ससाणे, अरूण लाड, लहू कानडे, राजेश राठोड, जिल्हाधिकारी एस रामामूर्ती, विधानमंडळ सचिवालयातील अवर सचिव प्र. श्री. खोंदले, कक्ष अधिकारी विनोद राठोड, सहा. कक्ष अधिकारी दत्तात्रय बेंगलवार  आदी उपस्थित होते.

त्यानंतर समितीने बोराखेडी ता. मोताळा येथील कुसूमावती जाधव नॉलेज हब या संस्थेला क्रीडा विभागाने दिलेल्या निधीतून बांधण्यात येत असलेल्या भांडार गृहाची पाहणी केली. तसेच कृषि उन्नत शेती समृद्ध शेतकरी अभियानातंर्गत कृषि यांत्रिकीकरण उपअभियान मधील लाभार्थी प्रमिलाबाई वासुदेव वाढे रा. सारोळा पीर, ता. मोताळा यांना मिळालेल्या ट्रॅक्टरची पाहणी करीत त्यांच्याशी संवाद साधला. मोताळा तालुक्यानंतर समितीने चिखली तालुक्यातील मालगणी येथे दलित वस्ती सुधार योजनेतंर्गत झालेल्या सिमेंट रस्ता कामाची पाहणी केली. सिमेंट रस्ता अंदाजपत्रकानुसार आहे किंवा नाही याबाबत प्रत्यक्ष रस्त्याची जाडी मोजून चाचपणी केली. त्यांनतर समितीने मालगणी येथे शासनाच्या जागेवर 2011 पासून राहत असलेल्या महिलेला घरकूल देण्याच्या सूचना दिल्या.   सवणा येथे नुकत्याच आलेल्या पुरामुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी केली. नुकसानग्रस्त शेतांमधील पिकांची माहितीही घेतली. नुकसानग्रस्तांना तातडीने मदत करण्याच्या सूचनाही समितीने दिल्या. याप्रसंगी संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »