महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
Default Image ठाणे लोकप्रिय बातम्या

धोकादायक असणारे सर्व होर्डिंग्ज त्वरित काढून टाकण्याचे केडीएमसी आयुक्तांचे आदेश

कल्याण/प्रतिनिधी – येत्या 4 दिवस कोकणातील ठाण्यासह चारही जिल्ह्यात हवामान खात्याकडून अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी आलेल्या तौक्ते चक्रीवादळामूळे कल्याण डोंबिवलीत रस्त्यावर उभारण्यात आलेली 3 भलीमोठी होर्डींग कोसळून काही जण जखमी झाले होते. या पार्श्वभूमीवर अतिवृष्टीच्या काळातही अशा दुर्घटना होऊ नये यासाठी धोकादायक असणारी सर्व होर्डिंग्ज त्वरित काढून टाकण्याचे आदेश महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिले आहेत.

हवामान खात्याने 9 जूनपासून पुढील 4 दिवस अतिवृष्टीचा इशारा दिल्यामुळे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी तातडीने सर्व संबंधित विभागांची ऑनलाईन बैठक बोलून आवश्यक त्या सूचना दिल्या. यात अतिवृष्टीच्या काळात धोकादायक इमारतीही तातडीने रिकाम्या करण्याचे निर्देश सर्व प्रभाग क्षेत्र अधिकाऱ्यांना दिले. तसेच अतिवृष्टीच्या काळात 3 दिवस पुरेल इतका डिझेलचा साठा करण्याबाबतच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत. तर ज्या ज्या ठिकाणी झाडे पडण्याची शक्यता असणाऱ्या वृक्षांची छाटणी करण्याचेही निर्देश त्यांनी दिले.
तर सखल भागात पाणी तुंबू नये याकरिता छोटे नाले आणि गटारं प्राधान्याने साफ करण्याच्या सूचनाही पालिका आयुक्तांनी या बैठकीत संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

तसेच गोविंदवाडीसारख्या अतिसखल भागात अतिवृष्टीच्या काळात पाणी शिरण्याआधीच तेथील तबेले रिकामे करून गुरांची बाहेरील बाजूस आणि रहिवाशांची संक्रमण शिबिरात व्यवस्था करण्याच्या सूचनाही यावेळी देण्यात आल्या आहेत.

तर महापालिकेच्या जम्बो कोविड रुग्णालयात विद्युत पुरवठा सतत चालू राहणे आवश्यक असल्याने अतिवृष्टी काळात रिस्टोरेशनची व्यवस्था करण्यासंदर्भातील सूचनाही महावितरणच्या कार्यकारी अभियंतांना देण्यात आल्या आहेत. अतिवृष्टीच्या काळात तातडीच्या परिस्थितीसाठी परिवहन विभागाने बसेसची सुविधा नागरिकांसाठी सज्ज ठेवण्याबाबत निर्देश आयुक्तांनी परिवहन विभागाचे उपायुक्त दीपक सावंत यांना देण्यात आले असून सर्व विभागीय उपायुक्तांनी त्यांच्या प्रभागात भेट देऊन एकंदर परिस्थितीचा आढावा घेण्याचे निर्देशही डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिले आहेत.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »