महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
Default Image इतर चर्चेची बातमी

नवी मुंबई मनपा अनलिमिटेड नेट पॅकसाठी विद्यार्थ्यांच्या बॅक खात्यावर जमा करणार १ हजार रूपये

नवी मुंबई/प्रतिनिधी – कोव्हीडच्या संभाव्य तिस-या लाटेच्या पार्श्वभूमीवर विविध उपाययोजना व आरोग्य सुविधांची परिपूर्ती केली जात असताना आगामी 2021-22 या शैक्षणिक वर्षात किमान पहिल्या सहामाहीत शाळा प्रत्यक्ष वर्गात न भरवता विद्यमान ऑनलाईन शिक्षण पध्दत सुरू राहील हे लक्षात घेऊन विद्यार्थ्यांचे कोणत्याही प्रकारचे शैक्षणिक नुकसान होणार नाही याकडे कटाक्षाने लक्ष दिले जात आहे. मागील वर्षीचा अनुभव लक्षात घेता नवी मुंबई महानगरपालिका शाळांमधील अधिकाधिक विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण उपलब्ध होण्याकरिता पुढाकार घेऊन नाविन्यपूर्ण गोष्टी केल्या जात आहेत. यामध्ये निदर्शनास आलेली एक महत्वाची बाब म्हणजे काही पालकांना आपल्या मुलांना ऑनलाईन शिक्षण उपलब्ध करून देण्याकरिता मोबाईलमध्ये आवश्यक असलेला नेटचा अनलिमिटेड डाटा पॅक टाकणे आर्थिक स्थितीमुळे शक्य होत नाही. त्यामुळे महापालिका शाळांमध्ये शिकणा-या विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन शिक्षणात कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये याकरिता सन 2021 – 22 या शैक्षणिक वर्षातील पहिल्या सहामाही करिता नेटच्या अनलिमिटेड डाटा पॅकसाठी 1000 रूपये विद्यार्थ्याच्या अकाऊंटमध्ये जमा करण्याचा निर्णय घेण्यात येत असल्याचे महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी सांगितले आहे.

त्याचप्रमाणे ज्या मुलांच्या पालकांकडे मोबाईल नाहीत अशा विद्यार्थ्यांसाठी पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नही करण्यात येत आहे. यावर्षीही विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणासोबतच कृती पुस्तिकाही उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. सदर कृतीपुस्तिकांचे विद्यार्थ्यांना वितरण करण्यात येईल. दर 15 दिवसांनी संबंधित शिक्षक त्या विद्यार्थ्यांच्या घरी भेट देऊन त्याने अभ्यास केलेली कृतीपुस्तिका त्याच्याकडून घेतील व पुढील अभ्यासाची कृतीपुस्तिका त्याला उपलब्ध करून देतील. ज्यायोगे त्या विद्यार्थ्याच्या अभ्यासाचे मूल्यमापनही करता येणे शक्य होईल. याशिवाय ऑनलाईन वर्गात काही विद्यार्थ्याकडून मोठ्याने पाठ वाचन करून घेणे, जेणकरून योग्य वाचनाची व उच्चारांची सवय होईल आणि समुहात वाचनामुळे व्यक्तिमत्व विकास होईल. त्याचप्रमाणे विविधांगी उपक्रमशील शिक्षण पध्दती राबविणे अशा नाविन्यपूर्ण संकल्पना साकारण्यात येणार असून यामधून आनंददायी व सर्वांगीण विकास करणारे गुणवत्तापूर्ण शिक्षण ही उद्दिष्ट्ये साध्य करण्यावर भर दिला जाणार आहे.

ऑनलाईन शिक्षण प्रक्रियेत उत्तम काम करणा-या स्वयंसेवी संस्थांचेही सहकार्य यामध्ये घेतले जाणार आहे. नवी मुंबई महानगरपालिका शाळांतील विद्यार्थ्यांकरिता ऑनलाईन शिक्षण पध्दत राबवून त्यांचा शैक्षणिक विकास थांबणार नाही याची दक्षता घेण्यासोबतच विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन शिक्षणाला नेट डेटा पॅकची रक्कम देऊन आर्थिक आधार देणा-या नवी मुंबई महानगरपालिकेच्या या विद्यार्थीहिताय निर्णयामुळे 35 हजाराहून अधिक विद्यार्थ्यांच्या पालकांना दिलासा मिळणार आहे.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »