महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
महाराष्ट्र लोकप्रिय बातम्या

१८ डिसेंबर रोजी ‘अल्पसंख्याक हक्क दिवस’

प्रतिनिधी.

मुंबई – राज्यात शुक्रवार, दिनांक १८ डिसेंबर हा दिवस ‘अल्पसंख्याक हक्क दिवस’ म्हणून साजरा करण्यात येणार आहे. कोविड-१९ विषाणूच्या संसर्गाची पार्श्वभूमी विचारात घेता केंद्र तसेच राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार लोकसहभागाबाबत योग्य खबरदारी घेऊन या संदर्भातील कार्यक्रम आयोजित करण्यात यावेत, असे आवाहन अल्पसंख्याक विकास विभाग आणि अल्पसंख्याक आयोगामार्फत करण्यात आले आहे. राज्यात कोरोनाबाबत आवश्यक ती खबरदारी घेत विविध कार्यक्रम आयोजित करण्याबाबत जिल्हाधिकारी आणि विविध संबंधित यंत्रणांना सूचना देण्यात आल्या आहेत.

संयुक्त राष्ट्र संघटनेने 18 डिसेंबर, 1992 रोजी राष्ट्रीय, वांशिक, धार्मिक आणि भाषिक अल्पसंख्याकांच्या हक्काचा जाहीरनामा स्वीकृत करुन प्रसृत केला. त्यानुसार अल्पसंख्याक नागरिकांना त्यांची संस्कृती, भाषा, धर्म, परंपरा इत्यादींचे संवर्धन करता यावे, तसेच याबाबतच्या वैशिष्ट्यांची प्रभावीपणे अभिव्यक्ती करता यावी यादृष्टीने प्रयत्न करण्याबाबत राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाने सूचना दिल्या आहेत. त्यानुसार प्रत्येक वर्षी 18 डिसेंबर हा दिवस “अल्पसंख्याक हक्क दिवस” म्हणून महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगामार्फत राबविण्यात येतो.

या दिवसाच्या अनुषंगाने अल्पसंख्याक नागरिकांना त्यांच्या घटनात्मक व कायदेशीर हक्कांची जाणीव, माहिती देण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने वेबिनारसारखे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात यावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर विद्यापीठे, महाविद्यालये आणि शाळांमध्ये यावर्षी कोणतेही कार्यक्रम आयोजित करता येणार नाहीत.

महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगामार्फत अल्पसंख्याकांसाठी शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांना ऑनलाईन व्याख्याने, चर्चासत्रे, वेबिनार इत्यादी पद्धतीने प्रसिद्धी देण्यात येणार आहे. राज्यात हा उपक्रम व्यापक प्रमाणात राबविण्यासाठी सर्व जिल्ह्यांना सूचना देण्यात आल्या असून जिल्ह्यात हा उपक्रम व्यापक प्रमाणात राबविण्याची जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांवर सोपविण्यात आली आहे.

कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे  काटेकोर पालन करून ऑनलाईन वेबिनार इत्यादीद्वारे जास्तीत जास्त व्याख्यानमाला, परिसंवाद, चर्चासत्र इ. कार्यक्रम आयोजित करावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

Related Posts
Translate »