महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
शिक्षण

मनसेचा असाही एक शिलेदार! मानधनातील वाटा देत सफाई कामगारांच्या मुलांच्या शिक्षणाला दिला मदतीचा हात

DESK MARATHI NEWS NETWORK.
कल्याण/प्रतिनिधी – लोकप्रतिनिधींना मिळणाऱ्या मानधनाचा वापर स्वतःसाठी न करता समाजातील गरजू घटकांच्या मदतीसाठी करणाऱ्या मनसेचे नगरसेवक प्रल्हाद म्हात्रे यांनी सामाजिक बांधिलकीचा आदर्श घालून दिला आहे. महापालिकेकडून दरमहा मिळणाऱ्या १० हजार रुपयांच्या मानधनात स्वतःकडील ११ हजार रुपये जोडून एकूण २१ हजार रुपयांची आर्थिक मदत सफाई कामगारांच्या मुलांच्या शिक्षणासाठी देण्याचा निर्णय त्यांनी घेतला होता. त्यानुसार बुधवारी एका सफाई कामगाराच्या मुलाच्या शिक्षणासाठी २१ हजार रुपयांचा धनादेश देण्यात आला.
११ सप्टेंबर रोजी झालेल्या महासभेत नगरसेवक प्रल्हाद म्हात्रे यांनी आपल्या मानधनातील रक्कम सफाई कामगारांच्या मुलांच्या शैक्षणिक मदतीसाठी देणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानुसार मनसेच्या नगरसेविका वैदांगी म्हात्रे आणि नगरसेवक प्रल्हाद म्हात्रे यांचा मुलगा राधाकृष्ण यांच्या हस्ते सफाई कामगार खंडू साळवे यांच्या हाती २१ हजार रुपयांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. यावेळी नगरसेवक प्रल्हाद म्हात्रे उपस्थित होते.
महापालिकेकडून मिळणारे १० हजार रुपयांचे मानधन शिक्षणासाठी अपुरे पडू शकते, हे लक्षात घेऊन म्हात्रे यांनी त्यात स्वतःकडील ११ हजार रुपये जोडण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे दरमहा २१ हजार रुपयांची मदत सफाई कामगारांच्या मुलांच्या शिक्षणासाठी उपलब्ध होणार आहे. शिक्षणाचा खर्च भागविण्यासाठी ही मदत उपयुक्त ठरणार असल्याचे म्हात्रे यांनी सांगितले.
सामाजिक बांधिलकी जपण्याची म्हात्रे यांची ही पहिलीच वेळ नाही. २०१४ ते २०१९ या कालावधीत ते परिवहन समितीचे सदस्य असताना त्यांना मिळणारे मानधन त्यांनी परिवहन उपक्रमातील वाहनचालकांच्या मुलांच्या शैक्षणिक कामासाठी दिले होते.
दरम्यान, ११ सप्टेंबरच्या महासभेपूर्वी झालेल्या स्थायी समितीच्या सभेत पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी पाणी खात्याचे अभियंता महेश डावरे आणि त्यांच्या टीमने केलेल्या चांगल्या कामाचे कौतुक करण्यात आले होते. समितीच्या सदस्यांनी आपल्या मानधनातून त्यांचा सन्मान केला होता. त्याच धर्तीवर प्रल्हाद म्हात्रे यांनीही आपल्या मानधनातून गरजू मुलांच्या शिक्षणासाठी मदतीचा हात पुढे केला आहे.
मनसेच्या या उपक्रमाचे मनसे नेते राजू पाटील यांनी कौतुक केले असून, लोकप्रतिनिधींनी आपल्या मानधनाचा उपयोग समाजातील गरजू घटकांसाठी केल्याचे हे उदाहरण असल्याचे म्हटले आहे.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »