महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
न्युजरूम पोलिस टाइम्स

आंबिवलीतील इराणी वस्तीत पोलिसांचे कॉम्बिंग ऑपरेशन, ८ लाखांच्या एमडीसह तिघे जेरबंद

DESK MARATHI NEWS NETWORK,
कल्याण/प्रतिनिधी – आंबिवली येथील इराणी वस्तीत खडकपाडा पोलिसांनी बुधवारी पहाटे मोठे कॉम्बिंग ऑपरेशन राबवत मोक्का, जबरी चोरी तसेच अमली पदार्थांच्या गुन्ह्यांत पाहिजे असलेल्या तीन आरोपींना जेरबंद केले. या कारवाईत एका आरोपीकडून तब्बल ८ लाख रुपये किमतीचा ४० ग्रॅम मेफेड्रॉन एम.डी.हा प्रतिबंधित अमली पदार्थ जप्त करण्यात आला आहे.

पोलीस उपआयुक्त, परिमंडळ-३ कल्याण यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक होनमाने यांच्या देखरेखीखाली पाच पोलीस पथके तयार करण्यात आली होती. या पथकांनी १२ ऑगस्ट रोजी पहाटेपासून आंबिवलीतील इराणी वस्तीत कॉम्बिंग ऑपरेशन सुरू केले. अमली पदार्थविरोधी तसेच इतर गंभीर गुन्ह्यांमध्ये पाहिजे आणि फरारी आरोपींचा शोध घेत असताना पोलिसांनी तीन आरोपींना शिताफीने घेराव घालत ताब्यात घेतले.

पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपींमध्ये शमा तेहजीब इराणी ,मोहम्मद गुलाम हुसेन जाफरी उर्फ शाहरुख आणि नफिसा हाश्मी इराणी  यांचा समावेश आहे.
यापैकी मोहम्मद गुलाम हुसेन जाफरी उर्फ शाहरुख याच्याकडे ४० ग्रॅम मेफेड्रॉन एम.डी.,सुमारे  ८ लाख रुपये किमतीचा, आढळून आला. याप्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात विविध कलमा अन्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने त्याला १५ ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, शमा इराणी ही विविध गुन्ह्यांत पाहिजे आरोपी असून तिच्याविरोधात खडकपाडा तसेच कुळगाव आणि वाकड पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल आहेत. तर नफिसा हाश्मी इराणी ही मानपाडा पोलीस ठाण्यातील मोक्का अंतर्गत दाखल गुन्ह्यात पाहिजे आरोपी असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »