महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
ठाणे न्युजरूम

डोंबिवली शास्त्रीनगर रुग्णालय पुन्हा वादाच्या भोवऱ्यात,अल्पवयीन मुलीच्या प्रेग्नन्सी टेस्टवरून आमदार राजेश मोरेंची कारवाईची मागणी

DESK MARATHI NEWS NETWORK.

कल्याण प्रातिनिधी – कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयातील अल्पवयीन मुलीच्या गर्भधारणा चाचणीच्या कथित चुकीच्या अहवालामुळे रुग्णालय पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत संबंधित डॉक्टर आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी आमदार राजेश मोरे यांनी केली आहे.

३० जून रोजी मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होत असल्याने १७ वर्षीय मुलीला उपचारासाठी शास्त्रीनगर रुग्णालयात आणण्यात आले होते. रुग्णालयात तिच्या गर्भधारणेची चाचणी करण्यात आली. या चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर पुन्हा चाचण्या तसेच सोनोग्राफी करण्यात आल्याची माहिती समोर आली.
मात्र, रुग्णालयातील अहवालानंतर बाहेरील ठिकाणी करण्यात आलेल्या चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आल्याने या संपूर्ण प्रकरणावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळे रुग्णालयातील चाचणी प्रक्रिया, अहवालाची अचूकता आणि संबंधित वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या कार्यपद्धतीबाबत चौकशीची मागणी जोर धरू लागली आहे.

या प्रकरणाची गांभीर्याने चौकशी करून दोषी आढळणाऱ्या संबंधित डॉक्टरांवर आणि जबाबदार कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आमदार राजेश मोरे यांनी केली आहे. दरम्यान, या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी केडीएमसी प्रशासनाकडून समिती गठीत करण्यात आली असून चौकशीत नेमके काय समोर येते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »