महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
न्युजरूम राजकीय

केडीएमसीच्या प्रभाग रचनेत चुकीची विभागणी, सर्वपक्षीयांकडून राज्य मागासवर्गीय आयोगाकडे हरकत

DESK MARATHI NEWS NETWORK.

कल्याण/प्रतिनिधी –  कल्याण-डोंबिवली महानगरपालिका प्रभाग रचना पॅनल प्रणालीतील अशोक नगर व शिवाजी नगर प्रभागाच्या चुकीच्या विभागणीबाबत आरपीआयने हरकत घेतली आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे माजी नगरसेविका मनिषा रणदिवे आणि कल्याण शहर माजी अध्यक्ष राजू रणदिवे, मंगल पाठारे, जितू अहिरे, सचिन चंदने, अमोल पंडित यांनी केडीएमसी आयुक्तांकडे तथा महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय आयोगाच्या अध्यक्षांकडे हरकत नोंदवली आहे. अशोक नगर व शिवाजी नगर हे प्रभाग कल्याण पूर्व पॅनलमध्येच समाविष्ट करण्यात यावेत. रामबाग, कर्णिक रोड रोड, जोशीबाग व पश्चिमेकडील प्रभागाशी जोडण्यांचा निर्णय तातडीने मागे घेण्यात यावा. याबाबत स्थानिक नागरिक, सामाजिक संस्था व संघटनांचा थेट सहभाग व सल्लामसलत घेण्याची मागणी करण्यात आली आहे.

आगामी महापालिका निवडणुकीसाठी करण्यात आलेल्या प्रभाग रचनेत प्रभागाची नैसर्गिक व भौगोलिक विभागणी मोडीत काढली. अशोक नगर व शिवाजी नगर हे ऐतिहासिक दृष्टया कल्याण पूर्व भागाशी जोडलेले आहेत. नागरिकांच्या दैनंदिन जीवनातील सर्व सुविधा, बाजारपेठ, शाळा, शासकीय कार्यालये, रेल्वे स्थानक यांचा उपयोग हा पूर्णपणे कल्याण पूर्वकडे केंद्रित आहे. तरीसुध्दा सध्याच्या पॅनल रचनेत या दोन्ही प्रभागांना राजकीय हेतूने कल्याण पश्चिमेकडे जोडण्यात आले आहे. हे पूर्णपणे अव्यवहार्य आणि अन्यायकारक आहे.

लोकसभा व विधानसभा कल्याण पूर्वेची असून खासदार डॉ. श्रीकांत शिंदे व आमदार सुलभा गायकवाड आहेत. या दोन्ही प्रभागातून दिल्ली कडे जाणाऱ्या रेल्वेलाईन आहेत. रेल्वे लाईन, नदी, मोठे रस्ते असतील तर त्या ओलांडून वॉर्ड करण्यात येऊ नये असे आदेश असतांना, या सर्व बाबी अशोक नगर शिवाजी नगर याठिकाणी येत असून मतदारांना व नागरिकांना पलीकडे जाण्यास कुठलीही सोय नाही. स्थानिक उमेदवारांना नागरीकांचे प्रश्न व समस्या व्यवस्थीत माहिती असतात. परंतु कल्याण पश्चिम भागाशी जोडल्यास या परिसरातील नागरिकांना बाहेरील, अनोळखी उमेदवाराकडे जाण्याशिवाय पर्याय राहणार नाही. यामुळे स्थानिकांचे मताधिकार व प्रतिनिधित्व दिशाभूल होऊन कमकुवत होईल.

अशोक नगर, शिवाजी नगर, तसेच लगतची आनंदवाडी व मिलिंद नगर हया वस्त्या मोठया प्रमाणावर मागासवर्गीय, अल्पसंख्याक, मजूर वर्ग व सामाजिक दृष्टया दुर्बल घटकांनी वसलेली आहेत. या भागातील नागरिकांचे प्रश्न वेगळे, ठोस व तातडीचे आहेत. झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन, मुलभूत सुविधा पाणीपुरवठा, रस्ते, गटार, शाळा व आरोग्यसेवा, रोजगार व उदरनिर्वाह या समस्यांची जाण असणारा स्थानिक नगरसेवकच योग्य तो निर्णय घेऊ शकतो. परंतू जर हा प्रभाग कल्याण पश्चिममध्ये जोडला तर येथील समस्यांकडे दुर्लक्ष होण्याची दाट शक्यता आहे.

अशोक नगर व शिवाजी नगर येथील नागरिकांची बहुतेक कामे कल्याण पूर्वमधील शासकीय कार्यालयांशी निगडीत आहेत. जर हे प्रभाग पश्चिममध्ये जोडले गेले तर नागरिकांना अनावश्यक अडचणी व त्रास सहन करावा लागेल. त्यामुळे ही विभागणी न्यायालयीन दृष्टीनेही अनुचित व आक्षेपार्ह ठरू शकते असे या हरकतीमध्ये नमूद करण्यात आले आहे.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »