महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
न्युजरूम पोलिस टाइम्स

आयुष्यात उच्च ध्येयाची नशा करा,अमली पदार्थाची नाही. – अप्पर पोलीस आयुक्त संजय जाधव

DESK MARATHI NEWS.
कल्याण/ संघर्ष गांगुर्डे – आजच्या धावत्या जगात मानवाला अनेक समस्याना सामोरे जावे लागत आहे. त्यात तरुण पिढी वाढत्या स्पर्धेत लवकरच नैराशाला बळी पडू अंमली पदार्थाच्या व्यसनाला बळी पडत आहे. ही तरुण पिढी उद्याचे देशाचे भविष्य आहे. आणि तीच जर अंमली पदार्थाच्या व्यसनाला बळी पडली तर हे देशाच्या भविष्यासाठी मारक आहे. याच पिढीचे प्रबोधन करण्याचा प्रयत्न कल्याण पोलिसांनकडून होताना दिसत आहे. 

कल्याण येथील बिर्ला कॉलेज येथे जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त खडकपाडा पोलीस स्टेशनचे वतीने वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ अमरनाथ वाघमोडे यांचे नेतृत्वाखाली अंमली पदार्थ विरोधी जनजागृतीचे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते . सदर वेळी कार्यक्रमात अप्पर पोलीस आयुक्त संजय जाधव हे विद्यार्थ्यांशी संवाद साधला. ते म्हणाले मी देखील कॉलेजमध्ये विद्यार्थी होतो ,मी देखील कॉलेजमध्ये धमाल केली, मस्ती केली परंतु माझ्या आय.पी.एस होण्याच्या ध्येया पासून लक्ष विचलित होऊ दिले नाही त्यामुळेच आज मी तुमच्यापुढे आय.पी.एस म्हणून उभा आहे. आयुष्यात नशा करा पण ती अंमली पदार्थांची नाही , तर उच्च ध्येयाची करा . अमली पदार्थाची कीक मारण्यापेक्षा, फुटबॉलला किक मारा. फुटबॉलची किक तुमचं आयुष्य उजळून टाकेल पण अंमली पदार्थांची किक तुमचं आयुष्य जाळून टाकेल म्हणून अमली पदार्थां पासून दूर राहा असे संजय जाधव यांनी विद्यार्थ्यांना आवाहन केले .

यावेळी कल्याण डोंबिवली महापालिकेचे आयुक्त अभिनव गोयल हे देखील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.त्यांनी आपल्या भाषणात पोलिसांनी राबवलेल्या उपक्रमाचे कौतुक करून उपस्थित विद्यार्थ्यांना अंमली पदार्थांपासून दूर राहण्याचे आवाहन केले. कार्यक्रमासाठी बिर्ला कॉलेजचे संचालक डॉ नरेशचंद्र , प्राचार्य अविनाश पाटील , दिशा फाउंडेशन संस्थेचे संस्थापक डॉ राजेंद्र कुऱ्हाडे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची प्रस्तावना पोलीस उपायुक्त  अतुल झेंडे यांनी केली.यावेळी त्यांनी पोलीस विभागातर्फे कल्याण डोंबिवली परिसरात पदार्थ विरोधी करण्यात येत असलेल्या कारवाईची माहिती दिली.

अमली पदार्थ विरोधी जनजागृती करिता खडकपाडा सर्कल ते बिर्ला कॉलेज पर्यंत अशी मुथा कॉलेज, सोनवणे कॉलेज ,आणि बिर्ला कॉलेज या कॉलेजच्या विद्यार्थ्यांची व पोलीसांची पायी रॅली आयोजित करण्यात आली होती. बिर्ला कॉलेज येथील विद्यार्थ्यांनी अमली पदार्थ विरोधी जनजागृती करणारा मूक अभिनय ॲक्ट सादर करून उपस्थितांची दाद मिळवली. सदर वेळी उपस्थित ७०० ते ८०० विद्यार्थ्यांसह सर्वांनी सामुदायिक अंमली पदार्थ विरोधी शपथ घेतली. तसेच खडकपाडा पोलीस स्टेशनच्या वतीने कॉलेजच्या विद्यार्थ्यांकरिता आयोजित करण्यात आलेल्या नशा मुक्तीवर आधारित ई पोस्टर्स चित्रकला स्पर्धेच्या विजेत्या स्पर्धकांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सुरेख सूत्रसंचालन  अजिता घोडेगावकर यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. डॉ. किशोर देसाई यांनी केले . उपस्थित विद्यार्थ्यांना अल्पोहराचे वाटप करून सामूहिक राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »