DESK MARATHI NEWS.
डोंबिवली/शंकर जाधव – कल्याण डोंबिवली महानगर पालिका हद्दीतील नाल्यांची पावसाळ्यापूर्वी साफ सफाई झाली की नाही हे पाहण्याकरता महापालिकाआयुक्त अभिनव गोयल हे गुरुवार 8 तारखेला डोंबिवली पश्चिमेला कोपर येथे आले होते. कल्याण डोंबिवली अंतर्गत जे, आई, के. डी, एफ प्रभागातील नाले सफाई कामाची पाहणी त्यांनी यावेळी केली. त्यांच्या सोबत सिटी इंजिनिअर, प्रभाग अधिकारी, कनिष्ठ अधिकारी, ठेकदार उपस्थित होते.
कोपर डोंबिवली पूर्वेकडील किड्स स्कुल जवळ असलेल्या नाल्याची साफसफाई करतानाची पाहणी करताना त्यांनी मशीनरी, पोकलेन, मनुष्यबळ जास्तीत जास्त वाढविण्याचे आदेश दिले. गाळ, सुका कचरा काढल्यानंतर तो सुकल्यानंतर दोन ते तीन दिवसात उचलण्याची सक्ती हि ठेकेदारांना त्यांनी केली. एकंदरीत पावसाळ्यापूर्वी नाले सफाईच्या कामाला वेग आला पाहिजे व २० मे पर्यंत नालेसफाई पुर्ण करण्याचे आदेश आयुक्त अभिनव गोयल यांनी ठेकेदार आणि अधिकाऱ्यांना यावेळी दिले.