नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.
पंढरपूर/प्रतिनिधी – महाराष्ट्रात कोणताही सन असो किंवा जयंती असो तो मोठ्या उत्साहानेच येथील नागरीक साजरी करतात. पण छ.संभाजी महाराजांच्या जयंतीला शिवभक्तांवर वेगळाच रंग चढलेला दिसतो. आज १४ मे रोजी महाराष्ट्राबरोबरच देशात संभाजी महाराजांची जयंती साजरी करण्यात येत आहे.
पंढरपूर मधील शिवभक्त प्रतिष्ठान गेल्या आठ वर्षापासून छत्रपती संभाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करत आहे. सालाबादप्रमाणे यंदाही शिवभक्त प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी या अनोख्या उत्सवाचे आयोजन केले. धर्म स्थापनेसाठी तुळजाभवानी मातेचा आशीर्वाद घेऊन छ.संभाजी महाराजांनी स्वराज्यासाठी अनेक लढाया लढल्या आणि जिंकल्या सुद्धा. त्यामुळेच यावेळी शिवभक्त प्रतिष्ठान ने संभाजी महाराजांच्या जयंतीसाठी तुळजाभवानी मातेवर आधारित थीम तयार केली. तुळजाभवानी मातेची भव्य प्रतिकृती साकारण्यात आली जी कार्यक्रमाचे केंद्रबिंदू ठरली.
यावेळी छत्रपती शिवाजी महाराज की जय, ‘संभा की जय बोलो, शिवा की जय बोलो’ अशा घोषणा शिवभक्तांनी केल्या. छत्रपती संभाजी महाराजांच्या भव्य पुतळ्याचे पूजन मंगळवेढा कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन पुरूशोत्तम अवताडे आणि अनिल सावंत यांनी केले.



