महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
चर्चेची बातमी विदेश

भारतीय नौदलातील दिल्ली, शक्ती आणि किलटान जहाजांची सिंगापूरला भेट

नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.

नवी दिल्ली/प्रतिनिधी – भारत आणि सिंगापूर या देशांदरम्यान द्विपक्षीय व्यवस्था तसेच परस्पर हित आणि सहकार्याच्या क्षेत्रांबाबत चर्चा तसेच क्षेत्रात सागरी सुरक्षा आणि स्थैर्य सुधारण्याबाबतच्या कटिबद्धतेची ग्वाही देण्याच्या उद्देशासह भारतीय नौदलातील दिल्ली, शक्ती तसेच किलटान या जहाजांनी 06 ते 09 मे 2024 या कालावधीत सिंगापूर देशाला भेट दिली. दक्षिण चीनजवळील समुद्रात  भारतीय नौदलातील पूर्वेकडील ताफ्याच्या परिचालनात्मक नेमणुकीचा भाग म्हणून ही भेट आयोजित करण्यात आली होती.

भारतीय नौदलातील पूर्वेकडील ताफ्याचे फ्लॅग ऑफिसर कमांडिंग रियर अॅडमिरल राजेश धनखड यांच्यासह जहाजांच्या कमांडिंग अधिकाऱ्यांनी सिंगापूर नौदलाच्या मुख्यालयात सिंगापूरच्या नौदलातील फ्लीट कमांडर पदावरील अधिकाऱ्यांची भेट घेऊन चर्चा केली. जहाजांच्या या भेटीमुळे नौदल सहकार्य आणि आंतरपरिचालन वाढवण्याबाबत चर्चा करण्याची संधी भारत आणि सिंगापूर या दोन्ही देशांच्या नौदलांना लाभली. आयएनएस शक्ती या जहाजाच्या डेकवर आयोजित करण्यात आलेल्या समारंभात दोन्ही देशांच्या नौदलांतील कर्मचारी तसेच सिंगापूरमधील भारतीय समुदायाचे लोक आणि स्थानिक राजनैतिक समुदायाला देखील मैत्री आणि परस्पर सन्मानाचे नाते आणखी दृढ करत एकमेकांशी संवाद साधण्याची संधी मिळाली.

सागराशी संबंधित शिक्षण आणि माहिती प्रसाराप्रती भारतीय नौदलाच्या वचनबद्धतेचा भाग म्हणून, भारतीय जहाजांना भेट देण्यासाठी सिंगापूरमधील स्थानिक शालेय विद्यार्थ्यांना आमंत्रित करण्यात आले होते.या मुलांना मार्गदर्शकाच्या मदतीसह जहाजांचा फेरफटका घडवण्यात आला तेथे मुलांनी नौदलाची विविध कार्ये, भारताचा समृद्ध सागरी इतिहास आणि वारसा तसेच सागरी सुरक्षेचे महत्त्व याविषयी माहिती घेतली. युवा पिढीला प्रेरित करून त्यांच्यात सागरी घडामोडींची अधिक समज निर्माण व्हावी या उद्देशाने हा परस्पर संवाद घडवण्यात आला. भारत आणि सिंगापूर या दोन्ही देशांच्या नौदलातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी, इतर व्यावसायिक विचारविनिमयासह परस्परांच्या जहाजांना भेटी देण्याचा तसेच विषय तज्ञांच्या विचारांच्या आदानप्रदानाचा (एसएमईई) उपक्रम देखील पार पाडला.

Related Posts
Translate »