महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
चर्चेची बातमी देश

स्वदेशी बनावटीच्या रणगाडा विरोधी क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी

नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम.

नवी दिल्ली/प्रतिनिधी – ‘एमपीएटीजीएम’च्या ‘टॅंडेम वॉर-हेड सिस्टीम’ ची अत्याधुनिक मुख्य रणगाड्याचे पोलादी कवच भेदण्याची क्षमता जोखण्याची चाचणीही या वेळी घेण्यात आली. ही चाचणी ठरविलेल्या निकषांवर उत्तीर्ण झाली. या यंत्रणेचा वापर दिवसा आणि रात्री असा दोन्ही वेळेस करता येणार आहे.

डीआरडीओ अर्थात संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने स्वदेशी बनावटीच्या एमपीएटीजीएम अर्थात मानवाला वाहून नेता येईल अशी मार्गदर्शित रणगाडाविरोधी क्षेपणास्त्र प्रणाली विकसित केली आहे. उच्च उत्कृष्टता असलेले हे तंत्रज्ञान सिद्ध करण्याच्या उद्देशाने वेगवेगळ्या उड्डाण स्वरूपात तिचे अनेकदा मूल्यांकन करण्यात आले आहे. या प्रणालीमध्ये एमपीएटीजीएम, प्रक्षेपक, लक्ष्य संपादन प्रणाली आणि अग्निशमन युनिटचा समावेश होता.
सेनाधिकारी मंडळ गुणवत्ता आवश्यकता (पायदळ,भारतीय लष्कर) मध्ये नमूद केल्यानुसार पुरेशा प्रमाणात क्षेपणास्त्र डागण्याच्या चाचण्या यशस्वीरित्या घेण्यात आल्या. राजस्थानमधल्या पोखरण फील्ड फायरिंग रेंज येथे 13 एप्रिल 2024 रोजी क्षेपणास्त्र उड्डाण चाचण्या यशस्वीरित्या घेण्यात आल्या. क्षेपणास्त्राची कार्यक्षमता आणि अस्त्र कामगिरी लक्षणीय आढळून आली.

या क्षेपणास्त्राच्या टँडम वॉरहेड प्रणालीच्या अचूक माऱ्याच्या चाचण्या यशस्वीरित्या पूर्ण झाल्या असून हे क्षेपणास्त्र आधुनिक धातू कवचाने संरक्षित मुख्य रणगाड्याला भेदण्यासाठी सक्षम असल्याचे या चाचण्यात आढळले आहे. एटीजीएम अर्थात रणगाडा विरोधी मार्गदर्शित क्षेपणास्त्र प्रणाली दिवसा, रात्री तसेच वरुन मारा करण्याच्या क्षमतेने सुसज्ज आहे. रणगाड्याच्या क्षेपणास्त्र क्षमतेमध्ये दुहेरी पद्धतीने काम करणारा सीकर म्हणजेच शोधक असणे हे लढाई दरम्यान उपयोगी पडणारे एक उत्तम मूल्यवर्धन आहे. या चाचण्यानंतर तंत्रज्ञानाचा विकास आणि यशस्वी प्रात्यक्षिकांचा निष्कर्ष काढण्यात आला असून ही प्रणाली आता अंतिम वापरकर्ता मूल्यमापन चाचण्यांसाठी सज्ज झाली आहे. या मूल्यमापन चाचणीनंतर या प्रणालीचा भारतीय सैन्यात समावेश होईल.

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी प्रणालीच्या यशस्वी चाचण्यांबद्दल संरक्षण संशोधन आणि विकास विभागाचे तसेच भारतीय लष्कराचे कौतुक करत प्रगत तंत्रज्ञानावर आधारित संरक्षण प्रणाली विकासामध्ये आत्मनिर्भरता प्राप्त करण्याच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल असल्याचे म्हटले आहे. संरक्षण संशोधन आणि विकास विभागाचे सचिव तसेच डीआरडीओचे अध्यक्ष डॉ समीर व्ही कामत यांनीही या यशाबद्दल चाचण्यांशी संबंधित संपूर्ण पथकाचे अभिनंदन केले.

Related Posts
Translate »