नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम.
नाशिक/प्रतिनिधी – केंद्र सरकारने दिनांक 7 डिसेंबर 2023 रोजी कांदा निर्यात बंदी केल्या संदर्भात शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात नुकसान शेतीमालाची झाली आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात शेतकरी वर्ग हा सरकारच्या विरोधात सरकारच्या विरोधात जागोजागी आंदोलने व निषेध करीत असून त्याच अनुषंगाने चांदवड येथे मुंबई आग्रा महामार्गावर आज शासनाच्या निर्यात बंदी धोरणा विरोधात माजी कृषिमंत्री शरद पवार यांना स्वतः चांदवड मुंबई आग्रा महामार्गावर येऊन रास्ता रोको आंदोलन करण्याची वेळ आली आहे.
यासाठी देशाचे माजी कृषिमंत्री चांदवड येथे रास्ता रोको आंदोलन करण्यासाठी आले असता. आंदोलनाची सुरुवात कृषी उत्पन्न बाजार समिती चांदवड येथून तर चांदवड मनमाड राज्य महामार्गाने पायी शासनाच्या विरोधात घोषणा देत व शरद पवार तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है अशी शेतकरी वर्ग व नागरिकांनी मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी करत शेतकार्यानी चांदवड मुंबई आग्रा महामार्ग चौफुली येथे रास्ता रोको आंदोलन केले.

यावेळी माजी आमदार शिरिष कोतवाल यांनी शेतकरी वर्गांना ठणकावून सांगितले की आपल्यासाठी वयाच्या 83 व्या वर्षी चांदवडच्या मुंबई आग्रा महामार्गावर आंदोलन करण्यासाठी आले आहे. त्यासाठी चांदवड देवळा व इतर तालुक्यांनी त्याची जाण ठेवावा असे प्रतिपादन माजी आमदार शिरीष कोतवाल यांनी यावेळी सांगितले.त्यामुळे या आंदोलनासाठी चांदवड देवळा निफाड येवला नांदगाव तालुक्यातील नव्हे तर संपूर्ण नाशिक जिल्ह्यातील शेतकरी वर्ग या आंदोलनासाठी सहभागी झालेले दिसत आहे त्यासाठी शासनाने लवकरात लवकर कांदा निर्यात बंदी उठवावी असे माजी कृषिमंत्री शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेताना आपल्या भावना व्यक्त केल्या.