नेशन न्यूज मराठी टीम.
जळगाव/प्रतिनिधी – शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळावा, यासह विविध मागण्यांसाठी जळगावात हजारोंच्या संख्येने आशा स्वयंसेविका आज रस्त्यावर उतरल्याचे चित्र पाहायला मिळाले. हजारोंच्या संख्येने अशा स्वयंसेविकांनी जळगाव जिल्हा परिषदेसमोर रास्ता रोको आंदोलन करून सरकारचा निषेध व्यक्त केला आहे. जळगाव जिल्हा परिषदेसमोर रास्ता रोको आंदोलन करत हजारोंच्या संख्येने आशा स्वयंसेविकांनी जोरदार घोषणाबाजी करत प्रशासनासह शासनाचा निषेध व्यक्त केला आहे.
अनेक वर्षांपासूनच्या आमच्या मागण्या मान्य होत नाहीत. त्या मान्य व्हाव्यात त्या मागण्यांबाबत लेखी आश्वासन मिळावे. मागण्या मान्य न झाल्यास संपूर्ण राज्यभरात 70 हजारांहून अधिक आशा स्वयंसेविका तसेच गटप्रवर्तक या रस्त्यावर उतरून तीव्र स्वरूपाचे आंदोलन करतील, असा इशाराही यावेळी देण्यात आला आहे.