महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
पर्यावरण लोकप्रिय बातम्या

राधानगरी धरण ओव्हर फ्लो,मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू

नेशन न्यूज मराठी टीम.

कोल्हापूर/प्रतिनिधी – कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या अठवड्याभरा पासून मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे जिल्ह्यातील राधानगरी पाणलोट क्षेत्रासह, आजारा, गगनबावडा परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे. परिणामी राधानगरी धरणाच्या पाणी पातळीत ही झपाट्याने वाढ होऊ लागली आहे. राधानगरी धरण 100% भरला असल्याने धरणाचे स्वयंचलित दरवाजे आता उघडू लागले आहेत. आज सकाळी सव्वा आठच्या सुमारास गेट क्रमांक 6 तर नऊ च्या सुमारास गेट क्रमांक 5 उघडला असून यामधून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग पंचगंगा नदी मध्ये सुरू आहे. यामुळे पंचगंगा नदी पाणी पातळीत ही झपाट्याने वाढ होत असून नदीची वाटचाल धोका पातळीकडे होऊ लागली आहे.

यामुळे प्रशासन ही अलर्ट झाली असून खबरदारी म्हणून नदीकाटच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. राधानगरी धरण पाणलोट क्षेत्रामध्ये सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे राधानगरी धरणाच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ होऊ लागली आहे. राधानगरी धरण सध्या 100 टक्के भरला असल्याने धरणाला असलेले स्वयंचलित दरवाजे आता उघडू लागले आहेत. आज सकाळी 8 वाजून 15 मिनिटांना दरवाजा क्रमांक 6 उघडला असून यामधून 1428 क्युसेक्स विसर्ग सुरू होता तर 9 च्या सुमारास आणखी एक स्वयंचलित दरवाजा उघडला असून पाचव्या आणि सहाव्या क्रमांकाच्या दरवाजातून एकूण 2856 क्यूसेक्स आणि पॉवर हाऊस मधून 1400 क्यूसेक्स असे एकूण 4256 क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग सध्या भोगावती नदीपात्रात सुरू आहे. धरण 100% भरल्यास धरणाचे दरवाजे आपोआप उघडतात. सध्या धरण पाणलोट क्षेत्रामध्ये अतिवृष्टी सुरू असून धरणामध्ये पाण्याची आवक मोठया प्रमाणात वाढली आहे. परिणामी आज सकाळी राधानगरी धरणाचे 2 स्वयंचलित दरवाजे उघडले आहेत. त्यामुळे नदीच्या पाणी पातळी मध्ये मोठया प्रमाणात वाढ होऊ लागली असून नदीकाठावरील नागरिकाना प्रशासनाकडून सुरक्षित स्थळी जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

तर कोल्हापूर जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे पंचगंगा नदी सध्या इशारा पातळीच्या वरून वाहत असून राजाराम बंधाऱ्याची पाणी पातळी 40 फूट 4 इंचावर गेली असून, पंचगंगा नदीची धोका पातळी 43 फूट आहे. पंचगंगा सध्या धोका पातळीकडे वाटचाल करत असून जिल्ह्यात आतापर्यंत 80 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. पंचगंगा नदीने आता आपली वाटचाल धोका पातळीकडे सुरू केल्याने यंत्रणा ही सतर्क झाले असून दरम्यान राधानगरी धरणातून मोठ्या प्रमाणत पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने प्रशासनाकडून आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास १०७७ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे. तर दरवर्षी महापुराचा सर्वात जास्त फटका बसणाऱ्या आंबेवाडी आणि चिखली गावांतील गावकऱ्यांना त्वरित सुरक्षित स्थळी जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »