महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
थोडक्यात महाराष्ट्र

वीजचोरी पडली महागात, दोन वर्षाचा तुरुंगवास,अहमदनगर न्यायालयाचा निकाल

नेशन न्यूज मराठी टीम.

नाशिक/प्रतिनिधी – अहमदनगर जिल्ह्यातील निंबळक, ता.जि. अहमदनगर येथील ग्राहकास वीजचोरी करणे महागात पडले आहे. वीजचोरीप्रकरणी पाराजी नारायण रोकडे यांना अहमदनगर न्यायालयाने दोन वर्षाच्या कैदेची शिक्षा ठोठावली आहे. या ग्राहकाने वीजमीटरमध्ये छेडछाड करून ३४ हजार १२९ वीज युनिटची, आर्थिक मुल्याप्रमाणे ४ लाख २४ हजार २८० रूपयांची वीजचोरी केली होती.

दि. ०८ नोव्हेंबर २०१६ रोजी निंबळक, ता.जि. अहमदनगर येथील वीजग्राहक पाराजी नारायण रोकडे यांचे अजित फूड्स या कंपनीच्या वीजमीटरची तपासणी करण्यात आली होती. त्यात वीज जोडणी मीटरमधील दोन स्टड कापून वीज मीटरमध्ये छेडछाड करून वीजचोरी करत असल्याबाबत निदर्शनास आले होते. ग्राहकाने ०८ नोव्हेंबर २०१६ रोजीच्या ३ महिने आधीपासून ३४ हजार १२९ युनिटची वीजचोरी केली आहे. ग्राहकास वीजचोरीच्या युनिटचे आर्थिक मुल्यानुसार रू. ४ लाख २४ हजार २८० इतकी वीजचोरी केल्याचे दिसून आले होते. सदर गुन्ह्यासाठी तडजोड आकार १० लाख आरोपीने भरला नाही त्यामुळे किरण महाजन यांनी महावितरणच्या विद्युत कायदा २००३ नुसार कलम १३५ अन्वये पाराजी नारायण रोकडे यांचेविरूध्द एमएस सीबी पोलीस स्टेशन नाशिक येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी झालेल्या सुनावणीत अहमदनगर न्यायालयाने आरोपीस दोन वर्षाची सक्त मजुरी व १५ हजार रुपये दंडाची, दंड न भरल्यास एक महिन्याची सक्त मजुरी ही शिक्षा ठोठावली आहे.

यामध्ये फिर्यादी  यांच्यासह श्री रमाकांत गरजे, रोहन धर्माधिकारी  सहायक अभियंता, महावितरण तसेच अतिरिक्त कार्यकारी अभियंता श्री लालचंद भराडे या साक्षीदारांची साक्ष  तांत्रिक बाबीचा अनुषंगाने नोंदविण्यात आली.

 या प्रकरणी सरकार पक्षातर्फे अति. सरकारी अभियोक्ता उज्वला जि. थोरात – पवार यांनी कामकाज पाहिले.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »