महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
चर्चेची बातमी मनोरंजन

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून सार्वजनिक सेवा प्रसारणाच्या अनिवार्यतेबाबत टीव्ही वाहिन्यांसाठी मार्गदर्शक सूचना जारी

नेशन न्यूज मराठी नेटवर्क.

नवी दिल्‍ली/प्रतिनिधी – माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने “भारतात टेलिव्हिजन वाहिन्यांचे अपलिंकींग आणि डाऊनलिंकिंग, 2022” विषयी 09.11.2022 रोजी मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत. या मार्गदर्शक तत्वांनुसार खाजगी वाहिन्यांना दररोज 30 मिनिटांसाठी सार्वजनिक सेवा प्रसारण करावे लागेल. खाजगी सॅटेलाईट टीव्ही वाहिन्या प्रसारणकर्ते आणि त्यांच्या संघटनांसोबत मंत्रालयाने या संदर्भात अतिशय विस्तृत चर्चा केली आणि त्यांच्याकडून प्राप्त झालेल्या अभिप्रायांच्या आधारे 30-1-2023 रोजी एक मार्गदर्शक सूचना जारी केली आहे.

या सूचनेनुसार मंत्रालयाने हे स्पष्ट केले आहे की प्रसारण करण्यात आलेल्या कार्यक्रमात समाविष्ट असलेला संबंधित आशय हा सार्वजनिक सेवा प्रसारण म्हणून समजण्यात येईल. तसेच हे देखील स्पष्ट करण्यात येत आहे की एकाच वेळी 30 मिनिटे कालावधीमध्ये या आशयाचे प्रसारण करण्याची गरज नाही त्याऐवजी तितक्या कालावधीची लहान लहान भागात विभागणी करून त्याचे प्रसारण करता येऊ शकेल आणि प्रसारकाने याबाबत प्रसारण सेवा पोर्टलवर मासिक अहवाल ऑनलाईन सादर करण्याची गरज आहे. प्रसारणाच्या विषयामध्ये राष्ट्रीय महत्त्वाचा आणि सामाजिक संदर्भाचा खालील विषयांसह आशय समाविष्ट असला पाहिजे. हे विषय आहेत..

  1. शिक्षण आणि साक्षरतेचा प्रसार;
  2. कृषी आणि ग्रामीण विकास;
  3. आरोग्य आणि कुटुंब कल्याण;
  4. विज्ञान आणि तंत्रज्ञान;
  5. महिला कल्याण;
  6. समाजातील दुर्बल घटकांचे कल्याण;
  7. पर्यावरण आणि सांस्कृतिक वारशाचे संरक्षण आणि
  8. राष्ट्रीय एकात्मता

खाजगी सॅटेलाईट टीव्ही वाहिन्यांकडून ऐच्छिक अनुपालन आणि स्वयं प्रमाणनाच्या माध्यमातून सार्वजनिक सेवा प्रसारण साध्य करण्याचा या मार्गदर्शक सूचनेचा उद्देश आहे.या मार्गदर्शक सूचनेची प्रत माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या वेबसाईटवरआणि या ब्रॉडकास्ट सेवा पोर्टलवर उपलब्ध आहे.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »