महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
अर्थसत्ता लोकप्रिय बातम्या

डीआरआय कडून तस्करी करण्यात आलेल्या बनावट चलनी नोटा जप्त

नेशन न्यूज मराठी टीम.

पुणे/प्रतिनिधी – महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) दिलेल्या  विशिष्ट माहितीच्या आधारे  पुणे प्रादेशिक शाखेच्या अधिकाऱ्यांनी जप्त करण्यात आलेल्या तस्करीच्या बनावट भारतीय चलनी नोटा  प्रकरणी  गुन्हा नोंदवला आहे.

पुणे विभागाच्या सीमा शुल्क अधिकाऱ्यांच्या समन्वयाने आणि सहकार्याने बुधवारी  (12 ऑक्टोबर 2022) ही कारवाई करण्यात आली. अधिकार्‍यांच्या पथकाने त्वरीत कारवाई करत  खडकी बाजार लेनमधून मोटारसायकल चालवणाऱ्या आणि एल्फिन्स्टन रोड ओलांडण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका व्यक्तीला पकडले. प्रत्येकी 500/- रुपये मूल्य असलेल्या एकूण 400  भारतीय बनावट चलनी नोटा ज्याचे दर्शनी मूल्य 2 लाख रुपये आहे, त्या सीमा शुल्क कायदा, 1962 च्या तरतुदीनुसार त्याच्याकडून जप्त करण्यात आल्या.

तसेच, तस्करीच्या बनावट भारतीय चलनी नोटा पुरवठ्यात सहभागी असलेल्या आणखी दोघांना डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी पकडले आहे. या बनावट नोटा बांगलादेशातून भारतात आणण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे.  या प्रकरणी वर नमूद केलेल्या तीन आरोपींना अटक करून न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »