महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
Default Image पर्यावरण महत्वाच्या बातम्या

जागतिक पर्यावरण दिवस निवडणूक आयोगाने साजरा केला

नेशन न्यूज मराठी टीम.

निवडणूक आयुक्त अनुप चंद्रा पांडे यांनी आज जागतिक पर्यावरण दिना निमित्त  भारतीय   निवडणूक आयोगाचे महासचिव उमेश सिन्हा, महा संचालक धर्मेंद्र शर्मा यांच्यासह निवडणूक आयोगाच्या अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर नवी दिल्ली येथील इंडिया आंतरराष्ट्रीय लोकशाही आणि निवडणूक व्यवस्थापन संस्थेच्या (IIIDEM) आवारात वृक्षारोपण केले. त्यांनी यावेळी एका पुस्तिकेचे प्रकाशन केले. तसेच भारतीय निवडणूक आयोग आणि राज्यांमधील निवडणूक अधिकाऱ्यांनी निवडणूक काळात केलेल्या विविध उपक्रमांची माहिती देणाऱ्या प्रदर्शनाचे उद्घाटन केले.

या कार्यक्रमाला संबोधित करताना निवडणूक आयुक्त अनुप चंद्रा पांडे म्हणाले, कमी करा,  पुनर्वापर करा आणि पुनर्निर्मिती करा हा पर्यावरण सापेक्ष निवडणूक व्यवस्थापनाचा आमचा  दृष्टीकोन आहे. पर्यावरण दिवस दर वर्षी साजरा केल्याने त्याचे महत्त्व अधोरेखित होते. यंदाची पर्यावरण दिनाची संकल्पना ‘निसर्गाशी एकरूपतेने जगणे’ ही असून ‘केवळ एक पृथ्वी’ हे त्याचे समर्पक घोष वाक्य असल्याचं ते म्हणाले. भारतीय निवडणूक आयोगाने मतदात्यांची ऑनलाईन नोंदणी यासह विविध प्रक्रियांचे डीजीटायझेशन करून तसेच मतदाता हेल्पलाईन ॲप, सुविधा पोर्टल सुविधा पोर्टल, केवायसी ॲप, सी-विजील, ई-एपिक, पीओडब्ल्यूडी ॲप, मतदाता मोजणी ॲप, विविध भागाधाराकांशी संबंधित प्रक्रियेचे डिजिटलायझेशन, उमेदवारांचे ऑनलाईन नामांकन, एकदाच वापराच्या प्लास्टिकचा वापर टाळणे, कचरा व्यवस्थापन यासारख्या उपक्रमांमधून पर्यावरण पूरक पद्धतीने निवडणुका सुनिश्चित केल्याचं ते म्हणाले.

भारतीय निवडणूक आयोगाने राज्यांमधील निवडणूक अधिकाऱ्यांना प्लास्टिक आणि अन्य घन कचऱ्याच्या व्यवस्थापनाबाबत सरकारने अधिसूचित केलेल्या नियमांचे पालन करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच त्यांनी  सरकारी नियमानुसार  फ्लेक्स, पत्रके, पिशव्या आणि अन्य प्रसिद्धी साहित्याची काळजी घ्यावी, आणि एकदाच वापरण्याजोग्या प्लास्टिकचा वापर टाळण्याचे निर्देश दिले आहेत.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »