महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
आरोग्य न्युजरूम

डोंबिवली शास्त्रीनगर रुग्णालयातील अल्पवयीन मुलीच्या प्रेग्नन्सी टेस्टवरून खळबळ, केडीएमसी कडून चौकशी समिती गठीत

DESK MARATHI NEWS NETWORK.

डोंबिवली/प्रतिनिधी – डोंबिवली शास्त्रीनगर रुग्णालयात उपचारासाठी दाखल झालेल्या १७ वर्षीय अल्पवयीन मुलीच्या प्रेग्नन्सी टेस्टचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याच्या प्रकाराने खळबळ उडाली आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत कल्याण-डोंबिवली महानगरपालिका प्रशासन ॲक्शन मोडमध्ये आले असून, या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती गठीत करण्यात आली आहे.
३० जून रोजी मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होत असल्याने संबंधित मुलीला शास्त्रीनगर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. यावेळी रुग्णालयात करण्यात आलेल्या यूपीटी युरीन प्रेग्नन्सी टेस्ट तिन्ही वेळा पॉझिटिव्ह आल्याची माहिती केडीएमसी प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
मात्र, मुलीच्या पालकांनी खासगी रुग्णालयात पुन्हा तपासणी केली असता तेथील अहवाल निगेटिव्ह आल्याचा दावा केला होता. त्यामुळे शास्त्रीनगर रुग्णालयातील तपासणी प्रक्रियेवर आणि अहवालांच्या अचूकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
या प्रकाराची चौकशी करण्यासाठी केडीएमसी प्रशासनाने समिती गठीत केली असून, रुग्णालयातील तपासणी प्रक्रिया, संबंधित वैद्यकीय नोंदी आणि अहवाल यांची तपासणी केली जाणार आहे. चौकशीत कोणाची चूक अथवा निष्काळजीपणा आढळल्यास संबंधितांवर नियमानुसार कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा केडीएमसीच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. दीपा शुक्ल यांनी दिला आहे.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »