महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
Default Image ताज्या घडामोडी बिझनेस

ऑनलाईन नोंदणी न केलेल्या यंत्रमागधारकांच्या वीजसवलत बंद करण्याच्या निर्णयास तूर्त स्थगिती

नेशन न्यूज मराठी टीम.

मुंबई – वीज सवलतीसाठी वस्त्रोद्योग विभागाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी न केलेल्या यंत्रमागधारकांची वीजसवलत बंद करण्याच्या निर्णयास तूर्त स्थगिती देण्यात आली आहे.  यंत्रमागधारकांची थांबविण्यात आलेली वीजसवलत पूर्ववत करण्याचे निर्देश वस्त्रोद्योग आयुक्तांना देण्यात आले आहेत, अशी माहिती वस्त्रोद्योग मंत्री अस्लम शेख यांनी दिली.

वस्त्रोद्योग मंत्री अस्लम शेख यांनी रविवारी, इचलकरंजी येथील संवाद सभेत यंत्रमागधारकांची वीजबिल सवलत पूर्ववत ठेवण्याचे आश्वासन दिले होते. या आश्वासनाची पूर्तता करत आज वस्त्रोद्योग आयुक्तांना वीज बिल सवलत पूर्ववत सुरू ठेवण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. ऑनलाईन अर्ज प्रणाली सुलभ करण्यासाठी तज्ज्ञांची समिती गठित करण्याबरोबरच यंत्रमागधारकांकडून सूचना मागविण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे मंत्री अस्लम शेख यांनी सांगितले.

२२ ऑक्टोबर २०२१ च्या शासन निर्णयानुसार २७ अश्वशक्तीपेक्षा जास्त जोडभार असणाऱ्या यंत्रमागधारकांना वीज बिल सवलतीसाठी ऑनलाईन नोंदणी बंधनकारक करण्यात आली होती. २९ डिसेंबर २०२१ रोजी वस्त्रोद्योग आयुक्तांनी महावितरणच्या मुख्य अभियंत्यांना पत्र लिहून ऑनलाईन नोंदणी न केलेल्या २७ अश्वशक्तीपेक्षा जास्त जोडभार असलेल्या यंत्रमागधारकांची वीज सवलत बंद करण्याच्या सूचना केल्या होत्या.  वीजसवलत बंद करण्याच्या निर्णयास तूर्त स्थगिती देण्यात येत असल्याच्या लेखी सूचना वस्त्रोद्योग विभागाने आज वस्त्रोद्योग आयुक्तांना कळविल्या आहेत. आता वीजसवलत पूर्ववत सुरू झाल्याच्या निर्णयामुळे राज्यभरातील यंत्रमागधारकांना  मोठा दिलासा मिळाला आहे.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »