नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.
नाशिक/प्रतिनिधी – लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोणत्या पक्षातून कोणाला उमेदवारी दिली जाईल या प्रश्नाबाबत प्रत्येकाच्या मनात उत्सुकता आहे. नाशिक मतदारसंघात महायुतीच्या जागेचा तिढा अजून सुटला नाही आहे. नाशिकच्या जागा वाटपावरून महायुतीत बरेच मतभेद आहेत. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना महायुतीने अद्याप उमेदवारी जाहीर केलेली नाही. आता छगन भुजबळ यांनी नाशिकच्या जागेबद्दल भाष्य केले आहे. नाशिक मतदार संघातील निवडणुका पाचवा टप्पात 20 मे रोजी होणार आहे. जिल्ह्यातील मतदारांचा आकडा ४८ लाख ७४ हजारांच्या जवळपास जाणार आहे.
राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी पत्रकारांशी संवाद साधला ते म्हणाले “नाशिक मधून मी फायनल झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी मला फोन करून शिरूर मधून लढता का? असे विचारले. शिरूर मध्ये देखील मोठ्या प्रमाणात ओबीसी समाज आहे. मी शिरूर मधून निवडणूक लढवली तर नाशिकची जागा त्यांना मिळाली असती, असा त्यामागे हेतू होता. मात्र, मी नाशिक सोडून जायचा प्रश्नच येत नाही.” असे भुजबळ म्हणाले. तसेच ओबीसी समाजाच्या नाराजी विषयी बोलताना त्यांनी भाष्य केले की लोकांच्या भावना आहेत ते व्यक्त करत असतात. सगळ्या गोष्टी आता मागे गेल्या आहेत.
नाशिक लोकसभा मतदार संघातून बहीण प्रीतम मुंडे यांना उमेदवारी देण्याची घोषणा पंकजा मुंडे यांनी केली होती. त्यावर “पंकजा मुंडे यांनी आपल्या निवडणुकीत लक्ष द्यावे. आमच्याकडे उमेदवार नाहीत असे नाही. खूप उमेदवार आहेत नाशिक मध्ये. पंकजा मुंडे यांनी बीड मध्ये लक्ष देण्याचा सल्ला छगन भुजबळ यांनी दिलं आहे.
“नाशिकमध्ये भुजबळांना उमेदवारी मिळाली असती,ते निवडून आले असते, असे वडेट्टीवार आपल्या सभेत म्हणाले होते. या वर आता भुजबळांनी आपली प्रतिक्रिया दिली “वडेट्टीवार माझ्या बद्दल चांगले बोलले मी त्यांचे आभार मानतो. त्यांचे माझ्यावर प्रेम आहे. म्हणून ते बोलले असतील. पक्षाच्या अडचणीमुळे ते माझ्यासोबत व्यासपीठावर येत नाहीत. त्याला मी पुतना मावशी चे प्रेम म्हणणार नाही. मी लढलो असतो तर जिंकून आलो असतो” वडेट्टीवारांनी दाखवलेल्या विश्वासाबाबत छगन भुजबळ यांनी त्यांचे आभार मानले.



