महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
ताज्या घडामोडी मुंबई

प्रकाश आंबेडकर यांच्या पुढाकाराने रायगड मधील ३२४ प्रकल्पग्रस्त कुटुंबांना नोकऱ्या नाकारल्याचा प्रश्न मार्गी

DESK MARATHI NEWS.

मुंबई/प्रतिनिधी – रिलायन्स इंडस्ट्रीजच्या रायगड जिल्ह्यातील नागोठाणे येथील प्रकल्पासाठी जमीन देणाऱ्या एकूण ३२४ प्रकल्पग्रस्त व्यक्तींना नोकऱ्या नाकारल्याचा प्रश्न प्रकाश आंबेडकर यांच्या पाठपुराव्यामुळे मार्गी लागला आहे.

वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष मा. प्रकाश आंबेडकर यांच्या ठाम नेतृत्वामुळे आणि सततच्या पाठपुराव्यामुळे आज मा. मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरीय बैठक घेण्यात आली. या बैठकीत नागोठाणे येथील आय.पी.सी.एल. (सध्या रिलायन्स इंडस्ट्रीज) प्रकल्पासाठी जमीन देणाऱ्या प्रकल्पग्रस्त कुटुंबांच्या मागण्या मांडण्यात आल्या.

अॅड.प्रकाश आंबेडकर, अॅड. संदेश मोरे आणि अॅड. हितेंद्र गांधी यांनी सरकारच्या निदर्शनास आणून दिलं की, प्रशासनाने एकूण १२३७ प्राधान्य प्रमाणपत्रे जारी केली होती, परंतु त्यापैकी केवळ ६९० व्यक्तींनाच नोकऱ्या मिळाल्या आहेत. उर्वरित ३२४ पात्र प्रमाणपत्रधारकांना आजतागायत नोकरी मिळालेली नाही, जे २६ एप्रिल १९८६ व २५ एप्रिल १९९० रोजी झालेल्या अधिकृत बैठकीतील आश्वासनांचे उल्लंघन आहे.

या प्रकरणाचा आढावा घेतल्यानंतर मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी रायगड जिल्हाधिकाऱ्यांना ७ दिवसांत ३२४ पात्र लाभार्थ्यांची अंतिम यादी तयार करून ती रिलायन्स इंडस्ट्रीजकडे सादर करण्याचे निर्देश दिले. तसेच या व्यक्तींना तातडीने नोकऱ्या देण्याचे आदेशही दिले. जर रिलायन्सने यामध्ये सहकार्य केले नाही, तर शासनाकडून कठोर कारवाई केली जाईल, त्यात कंपनीचे प्रकल्प सील करणे किंवा बंद पाडणे यासारख्या उपायांचा समावेश असणार आहे.

या लढ्याला भूमिपुत्र प्रकल्पग्रस्त सामाजिक संस्थेचे अध्यक्ष गंगाराम माया मिंमिने आणि वंचित बहुजन माथाडी, ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियनचे सचिव सुरेश गणपत मोहिते यांनी सक्रिय पाठिंबा दिला आहे.

आजचा निर्णय हा विकासासाठी आपली जमीन देणाऱ्या कुटुंबांना दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्याच्या दिशेने एक ठोस पाऊल आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या दृढ नेतृत्वामुळे या कुटुंबांच्या मागण्या राज्यशासनाच्या सर्वोच्च पातळीपर्यंत पोहोचल्या आहेत आणि नोकरी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »