महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
महाराष्ट्र लोकप्रिय बातम्या

कोंकण विभागीय माहिती उपसंचालक पदाचा रवी गिते यांनी स्विकारला पदभार

DESK MARATHI NEWS.

नवी मुंबई/प्रतिनिधी :– माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातील वरिष्ठ अधिकारी रवी गिते यांनी आज कोकण विभागीय माहिती उपसंचालक या पदाचा कार्यभार स्वीकारला. नवी मुंबईतील कोकण भवन येथे आयोजित छोटेखानी कार्यक्रमात प्रभारी उपसंचालक श्रीमती अर्चना शंभरकर यांच्याकडून त्यांनी पदाचा कार्यभार स्वीकारला.याप्रसंगी ठाण्याचे जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप, कोंकण विभागीय अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष मनोज जालनावाला, सहायक संचालक संजिविनी जाधव-पाटील, उपसंपादक प्रविण डोंगरदिवे, पत्रकार मच्छिंद्र पाटील, कोंकण विभागीय कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.

सामान्य प्रशासन विभागाच्या २२ एप्रिल रोजी काढलेल्या आदेशानुसार, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातील सात वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपसंचालक (माहिती) पदावर पदोन्नती करण्यात आली आहे. या यादीत जिल्हा माहिती अधिकारी, वर्धा म्हणून कार्यरत असलेले रवी गीते यांचाही समावेश आहे.गिते यांचे पत्रकारितेपासून शासकीय सेवेपर्यंतचे प्रवास अत्यंत उल्लेखनीय ठरले आहेत. शासकीय सेवेत येण्यापूर्वी त्यांनी लोकपत्र, नवराष्ट्र आणि सामना या प्रमुख दैनिकांत पत्रकार म्हणून कार्य केले. त्यांच्या पत्रकारितेतील अनुभवाचा त्यांनी माहिती विभागातील सेवेमध्ये प्रभावीपणे उपयोग केला आहे.

शासकीय सेवेत रुजू झाल्यानंतर त्यांनी नवी दिल्ली येथील महाराष्ट्र परिचय केंद्रात सहायक संचालक म्हणून सुरुवात केली. त्यानंतर चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया आणि नागपूर या जिल्ह्यांमध्ये त्यांनी जिल्हा माहिती अधिकारी म्हणून यशस्वीपणे कार्य केले. सध्या ते वर्धा जिल्ह्यात जिल्हा माहिती अधिकारी या पदावर कार्यरत होते.त्यांच्या पदोन्नतीनंतर आता त्यांनी कोकण विभागीय माहिती उपसंचालक या नव्या आणि जबाबदारीच्या पदावर रुजू होत कोकण विभागातील शासकीय माहिती व्यवस्थापनाला अधिक सक्षम दिशा देण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यांच्या कार्यकुशलतेचा आणि अनुभवाचा फायदा कोकण विभागाला निश्चितच होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »