महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
न्युजरूम पोलिस टाइम्स

मुंबई विमानतळावर 9.53 कोटी रुपयांच्या गांजासह 58.83 लाख रुपयांचे सोने जप्त

DESK MARATHI NEWS ONLINE.
मुंबई/प्रतिनिधी – मुंबई सीमा शुल्क विभाग झोन-III च्या अधिकाऱ्यांनी, तस्करी विरोधातील आपली मोहीम सुरू ठेवत मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर (सीएसएमआय) दोन वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये मोठ्या प्रमाणावर अंमली पदार्थ आणि सोने जप्त केले.
 हायड्रोपोनिक गांजा म्हणजेच मातीशिवाय वनस्पती लागवड पद्धतीने पिकवलेला गांजा जप्त करण्यात आला आहे  ज्याचे काळ्या बाजारातील मूल्य सुमारे 9.53 कोटी रुपये आहे.स्पॉट प्रोफाइलिंग या वर्तन आधारित निगराणीच्या आधारावर, सीमा शुल्क अधिकाऱ्यांनी इंडिगो एअरलाइन्सच्या फ्लाइट 6 ई 1052 ने बँकॉकहून मुंबईला आलेल्या एका प्रवाशाला अटक केली. प्रवाशाच्या ट्रॉली बॅगची तपासणी केली असता त्यात आढळलेला 9.532 किलो संशयास्पद हायड्रोपोनिक गांजा जप्त करण्यात आला. ज्याची काळ्या बाजारातील किंमत सुमारे 9.53 कोटी रुपये आहे. हा गांजा ट्रॉली बॅगमध्ये हुशारीने लपवण्यात आला होता. अंमली पदार्थ आणि मनस्थितीवर परिणाम करणारे घटक (एनडीपीएस) कायदा, 1985 च्या संबंधित तरतुदींनुसार प्रवाशाला अटक करण्यात आली. सध्या पुढील तपास सुरू आहे.

एका वेगळ्या प्रकरणात, विशिष्ट गुप्त माहितीच्या आधारे, सीमा शुल्क अधिकाऱ्यांनी इंडिगो एअरलाइन्सच्या फ्लाइट 6 ई 1854 द्वारे दुबईहून मुंबईला आलेल्या दोन प्रवाशांना अटक केली. या प्रवाशांची झडती घेतली असता त्यांच्या जवळ आढळलेले 21 कॅरेट शुद्धतेचे कच्चे सोने अधिकाऱ्यांनी जप्त केले. या सोन्याचे वजन 0.789 किलो असून त्याची सध्याची  किंमत 58.83 लाख रुपये आहे. प्रवाशांनी परिधान केलेल्या अंतर्वस्त्रांमध्ये हे सोने लपवण्यात आले होते. या प्रकरणात सीमा शुल्क कायद्यानुसार आवश्यक कारवाई केली जात असून पुढील तपास सुरू आहे.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »