महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
ठाणे लोकप्रिय बातम्या

ठाणे-बेलापूर वाशी डाउन रेल्वे मार्गावरील फेऱ्या वाढविण्याची वंचितची मागणी

प्रतिनिधी.

कल्याण – देशाअंतर्गत सध्या अनलॉकची प्रक्रिया चालू आहे. अत्यावश्यक सेवेमध्ये समाविष्ट कर्मचाऱ्यांना रेल्वेने प्रवास करण्याची मुभा दिलेली आहे. परंतु कल्याण वरून व्हाया ठाणे बेलापूर वाशी या ठिकाणी काम करण्यास जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होत आहे. संध्याकाळच्या वेळेस डाऊन मार्गावरच्या लोकल फेऱ्या कमी प्रमाणात असून एकच फेरी असल्याने रेल्वेने प्रवास करणाऱ्या कर्मचाऱ्यांची मोठी गैरसोय होत आहे. ही गैरसोय दूर करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे महासचिव विजय कांबळे यांचे नेतृत्वाखाली कल्याण शहर अध्यक्ष ॲड. प्रवीण बोदडे , वंचितचे जिल्हा संघटक विनोद रोकडे, ज्येष्ठ कार्यकर्ते सुरेश पंडित, जितेंद्र भुकाने, नागसेन भोसले, सचिन नागरे यांच्या शिष्टमंडळाने मध्य रेल्वे स्टेशन प्रबंधकांना आज निवेदन दिले. डाऊन मार्गावरील रेल्वे फेऱ्या वाढविण्याबाबत त्याचा पाठपुरावा करून त्याची अंमलबजावणी करण्याची विनंती करण्यात आली.

सायंकाळच्या वेळेस बेलापूर वाशी ठाणे या ठिकाणी अनेक खाजगी कंपन्या तसेच सरकारी कार्यालय असून त्यांच्या कर्मचाऱ्यांची सुटण्याची वेळ एकच असल्याने सायंकाळच्या वेळेस या सर्व रेल्वे स्थानकावर प्रचंड गर्दी होते. त्यामुळे ठाण्याला येण्यासाठी सायंकाळच्या वेळेस एकच रेल्वे फेरी असल्याने प्रवाशांची अत्यंत गैरसोय होत आहे. अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या कर्मचाऱ्यांना नाइलाजास्तव बस, एसटी, खाजगी वाहनाने कल्याण शिळफाटा मार्गे प्रवास करावा लागतो. त्यामुळे त्यांचा वेळ व पैसा दोन्ही वाया जात आहे. हे लक्षात घेता रेल्वेने सायंकाळच्या वेळेस डाउन मार्गावर जास्तीत जास्त रेल्वे फेऱ्या सुरू कराव्यात, अशी विनंती वंचित तर्फे करण्यात आली आहे.

Related Posts
Translate »