महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
ठाणे ताज्या घडामोडी

ठाणे जिल्हा परिषदेतील शाळेत इकोफ्रेंडली होळी साजरी

नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.

ठाणे/प्रतिनिधी – भारतीय संस्कृतीतील सण समारंभ उत्सव म्हणजे आनंदाचा ठेवा. त्याच बरोबर भारतीय संस्कृतीत सण वारला एक वेगळेच महत्व आहे. प्रत्येक संस्कृतीचे सण वेगवेगळे आहेत पण सर्वजण मिळून हे सण एकत्र गुण्यागोविंदाने साजरा करतात. सध्याच्या बदललेल्या पर्यावरणाच्या वातावरणामध्ये नैसर्गिक आणि इकोफ्रेंडली होळी साजरी करणे ही काळाची गरज ठरत आहे. आज जिल्हा परिषद केंद्र शाळा, राहनाळ, तालुका भिवंडी येथील विद्यार्थ्यांनी इकोफ्रेंडली होळी व धुळवड साजरी करून आनंद साजरा केला.

राहनाळ शाळेत होळी व धुळवड सणाच्यानिमित्ताने पारंपारिक होळी बरोबरच राजश्री पाटील, अनघा दळवी, चित्रा पाटील या शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली मुलांनी बीट, गाजर, झाडाची पान-फले आणि हळद यांच्यापासून नैसर्गिक रंग तयार केले. आजूबाजूचा कचरा, शेणाच्या गोवऱ्या, कापूर, विद्यार्थ्यांच्या मनातील वाईट विचार नाहिसे करण्यासाठी होळीच्या भोवती पताका म्हणून मुलांच्या मनातील नकारात्मकता कागदावर लिहून इयत्ता पहिलीच्या विद्यार्थीनी सिद्धी पांडे व परी बिंद यांच्या हस्ते होळी पेटवण्यात आली. यावेळी संध्या जगताप, रसिका पाटील यांनी होळीची पारंपरिक गीते सादर केली. होलीकेची कथा अंकुश ठाकरे यांनी सांगितली.

केंद्रप्रमुख शरद जाधव यांनी होळी सणाचा विज्ञानाशी असलेला संबंध उलगडून सांगितला. ग्रामपंचायत लिपिक विश्राम नाईक, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्रमिला कडू, सदस्य प्रतिभा नाईक, पालक  तसेच विद्यार्थीं मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी होळीसाठी जिवंत झाड तोडू नये, पाण्याची बचत करावी, केमिकल मिश्रित रंग वापरू नये, प्लॅस्टिक पिशव्या आणि फुगे एकमेकांवर मारू नये असा सल्ला शाळेचे मुख्याध्यापक अजय पाटील यांनी विद्यार्थ्यांना दिला.

पर्यावरणपूरक सण साजरा करण्यासाठी शाळेतील शिक्षकांनी मोलाची कामगिरी केली आहे. विद्यार्थ्यांना वेळोवेळी माहिती देत त्याबद्दल जाणिव करून देणे आणि प्रत्यक्षात कृती करण्यासाठी प्रोत्साहित करणे गरजेचे आहे. डाग लावण्यापेक्षा नकारात्मक विचारांचे डाग धुवून टाकावेत – शिक्षणाधिकारी प्राथमिक, बाळासाहेब राक्षे 

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »