महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
ताज्या घडामोडी मनोरंजन

अल्ट्रा झकासच्या विश्वात ‘रेडीमिक्स’ आणि ‘जय स्वच्छमेव जयते बोला’ चित्रपट सामाविष्ट

नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.

मुंबई/प्रतिनिधी – संपूर्ण महाराष्ट्रात ‘रेडीमिक्स’ आणि ‘जय स्वच्छमेव जयते बोला’ या चित्रपटांनी जोरदार धुमाकूळ घालून रसिक प्रेक्षकांच्या मनात घर केलं होतं. दोन्ही चित्रपट आता पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीस येण्यासाठी सज्ज झाले आहेत. ‘रेडीमिक्स’ हा ‘अल्ट्रा झकास’ या मराठी ओटीटीवर उपलब्ध झाला असून ‘जय स्वच्छमेव जयते बोला’ १८ मार्च २०२४ रोजी ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे.

आपल्या मोठ्या बहिणीला प्रेमात मिळालेल्या धोक्याच्या निराशेतून बाहेर काढण्यासाठी नूपुरने आखलेली योजना यशस्वी होईल का, हे रेडीमिक्स चित्रपटात तर गोगलगावातील लोकांना घाणीतून स्वच्छ आणि सुंदर गाव करण्यासाठी अनासपूरेंची योजना यशस्वी होईल का, हे जय स्वच्छमेव जयते बोला या चित्रपटात बघता येणार आहे. ‘रेडीमिक्स’ चित्रपटात वैभव तत्ववादी, प्रार्थना बेहेरे आणि नेहा जोशी यांचा जबरदस्त अभिनय पहायला मिळणार असून मकरंद अनासपूरे यांनी ‘जय स्वच्छमेव जयते बोला’ चित्रपटात आपल्या विनोदी ढंगाने समाजासाठी एक गंभीर संदेश दिला आहे.

“समाजात मनोरंजन महत्वाचं आहे, त्याचबरोबर समाजाचं प्रबोधनही तेवढंच महत्वाचं आहे. मनोरंजातून प्रबोधन करणारे रेडीमिक्स आणि जय स्वच्छमेव जयते बोला हे चित्रपट प्रेक्षकांना बहाल करताना मनात एक उत्स्फूर्त भावना आहे” असे अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेडचे सी.ई.ओ. श्री.सुशीकुमार अग्रवाल म्हणाले.
नवनवीन चित्रपट पाहण्यासाठी :- https://www.ultrajhakaas.com/marathi-movies

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »