नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.
कल्याण/प्रतिनिधी – प्रशासनाकडून आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला तीन महिन्यांसाठी अभय योजना राबविण्यात आली होती. मात्र या काळात ही योजना वापरकर्त्यांपर्यंत पोहोचली नसल्याने वापरकर्त्यांना या योजनेचा लाभ घेता आला नव्हता. यासाठीच महापालिकेच्या उत्पन्नात वाढ होण्यासाठी तसेच करदात्यांनाही लाभ मिळावा यासाठी केडीएमसीकडून ४ मार्च ते ३१ मार्च दरम्यान अभय योजना पुन्हा राबविली जाणार आहे. त्याच बरोबर पाणीपट्टी व घरपट्टी या दोन्ही करांना ही योजना लागू असेल. अशी माहिती पालिका आयुक्त डॉक्टर इंदुराणी जाखड यांनी माध्यमांना दिली आहे. त्याच बरोबर नागरिकांनी या अभय योजनेचा जास्तीत जास्त लाभ घेऊन प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
शासनाच्या शासन आपल्या दारी उपक्रमाची सांगता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मंत्रिमंडळातील अनेक मंत्र्यांच्या उपस्थितीत डोंबिवलीत रविवारी ३ मार्च रोजी होणार आहे. 3 मार्चला शासन आपलादारी कार्यक्रम मुख्यमंत्रीसह दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत. 29 जानेवारीपासून कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात शासन आपल्या दारी उपक्रमाच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजनांचा लाभ गरजू नागरिकांना दिला जात आहे आता पर्यंत २९ हजार नागरिकांनी या योजनेचा लाभ घेतला असून या लाभार्थ्यांना या कार्यक्रमात प्रमाणपत्र दिले जाणार आहेत. तर यानिमित्तानेच डोंबिवली शहरातील कॅन्सर रुग्णालय मासळी मार्केट अभ्यासिका यासारख्या विविध कामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण देखील मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती आयुक्तांनी दिली तसेच तीन मार्च रोजी कल्याण शीळ रस्त्यावरील असलेल्या प्रीमियर ग्राउंड वर हा कार्यक्रम संपन्न होणार आहे.



