नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम.
डोंबिवली/प्रतिनिधी – जरांगे पाटलांचा हट्ट किंवा बाळ हट्ट सरकारने पुरवु नये ,कोर्टात आरक्षण टिकत नसेल तर आरक्षण कसले देता असा सवाल आज ओबीसी समाज संघटनेचे कल्याण तालुका अध्यक्ष विश्वनाथ जाधव यांनी केला. ओबीसी समाज संघटनेचा आज डोंबिवली जवळील पिंपळेश्वर मंदिरात मेळावा होता. या मेळाव्यात मराठ्यांना ओबीसी मधून कुणबी म्हणून आरक्षण देण्यास विरोध दर्शविण्यात आला. तसेच येत्या काळात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देखील दिला आहे.
दरम्यान मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देण्याची मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केल्यानंतर ओबीसी विरुद्ध मराठा असा संघर्ष दिसून येतो आहे. या पार्श्वभूमीवर कल्याण-डोंबिवली मधील ओबीसी समाज देखील एकवटला आहे .यावेळी बोलताना या विरोधात कल्याण तालुक्यात मोठी सभा होणार असून आम्ही विरोध करणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच आमच्या समाजाच्या आमदारांच्या गाड्या अडवता, फोडता, घर जाळता त्यांनी कधी मराठा आरक्षणाला विरोध केलाय का? असा सवाल विश्वनाथ जाधव यांनी केला आहे.



