महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
इतर

शासनाच्या कल्याणकारी योजना ग्रामीण भागातील लोकांपर्यंत पोहोचवा- नाना पटोले

प्रतिनिधी.

भंडारा – टाळेबंदीचा फटका सर्वांना बसला असून विशेषत: ग्रामीण भागातील शेतकरी व मजुरांची आर्थिक घडी बिघडली आहे. याची जाणीव ठेवून शासनाच्या कल्याणकारी योजना ग्रामीण भागातील लोकांपर्यंत पोहचविण्याचे काम ग्रामसेवक, तलाठी व पोलीस पाटील, कृषि सहाय्यक यांनी करण्याचे निर्देश विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी दिले. लोकांनी माझ्यावर जो विश्वास दाखविला तो सार्थ ठरविण्यासाठी पदाचा उपयोग क्षेत्राच्या सर्वांगिण विकासासाठी करण्याची ग्वाही त्यांनी दिली.

लाखांदूर तालुक्यातील सोनी येथे 41.45 लाख खर्चून नळ योजना व जलशुध्दीकरण व चप्राड येथे 88. 73 लाख खर्चून नळ योजना व जलशुध्दीकरण केंद्राचे लोकार्पण व जिल्हा परिषद शाळांच्या नवीन खोल्यांचे उदघाटन विधानसभा अध्यक्षांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष रमेश डोगरे, जिल्हापरिषद सदस्य प्रदिप बुराडे, पंचायत समिती सदस्य राजाभाऊ ठाकरे, सोनीच्या संरपंच कल्पना खंडाते, उपअभियंता संजय मारबते, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मोहन पंचभाई उपस्थित होते. पाणी हे जीवन आहे, शुध्दपाणी सोनी व चप्राड वासियांना मिळवून देण्याचे काम आज लोकप्रतिधीच्या हस्ते झाले ही आनंदाची बाब आहे. गावच्या सरपंच या महिला आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थेत आदिवासी, अनुसूचित जाती, ओबीसी व भटक्या विमुक्त जाती व जमातीच्या महिला प्रतिनिधींना संधी मिळावी ही स्व. राजीव गांधी यांची संकल्पना होती. आज ती प्रत्यक्षात दिसत आहे, असे विधानसभा अध्यक्षांनी सांगितले. विकास आराखडा प्रत्यक्षात उतरवितांना येणाऱ्या काळात विधानसभा क्षेत्रातील तीनही तालुक्यात उद्योग उभारण्यात येणार आहेत. त्यासाठी क्षेत्रातील सर्व तहसिलदारांनी जागेची निवड करुन जागा उपलब्ध करुन देण्याचे निर्देश त्यांनी दिले. सर्व तालुक्यांना समान न्याय देवून टाळेबंदीच्या काळात सर्वांना रोजगार देण्यासाठी समावून घेण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. 700 रुपये धानाला बोनस दिल्यामुळे गोंदिया व भंडारा येथील धानाचे उत्पन्नात एकदम दुप्पट व तिप्पटीने वाढ झाली असून यामध्ये व्यापाऱ्यांचे धान असल्याचे कळते, त्यामुळे शेतकऱ्यांना बोनस रोवणीचे वेळी अनुदान स्वरुपात देण्यात येईल, त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही अशा सूचना शासनास दिल्याचे त्यांनी सांगितले. कर्जमाफी सरसकट देण्याचा या सरकारचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हयाचे विभाजन होऊन 11 वर्ष झाले तरी जंगलांचा प्रश्न जसाच्या तसा होता. तो आता सुटला असून लांखांदूर-इंदोरा भागातील सर्व जंगल भंडारा जिल्हयात वळता करण्यात आला असून नागरिकांना जो त्रास सहन करावा लागत होता त्यापासून त्यांनी सुटका झाली आहे. सोनी आवळी पुलासह बंधाऱ्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे. तसेच चप्राड विहिरगाव पूल बंधाऱ्यासह कामास लवकरच सुरुवात होणार असून यामुळे या भागातील शेतकऱ्यांच्या समस्या सुटणार आहेत. जिल्हयात चुलबंद नदीवर ज्या ठिकाणी पुल आहे तिथे बंधारा बांधण्याचे प्रायोजित असून यामुळे शेतकऱ्यांच्या सिंचनाचा प्रश्न सुटणार आहे, असे त्यांनी सांगितले.सहामहिन्यापासून सोनी येथील जलशुध्दीकरण योजनेच्या कामाचा पाठपूरावा करण्यात येत होता. लोकांच्या सहकार्याने आज ही योजना प्रत्यक्षात उतरविता आली आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष झाल्यापासून जिल्हयातील दुर्लक्षित गावाला अधिकाधिक सुविधायुक्त व सुंदर गाव कसे बनविता येईल याकडे आपले नेहमी लक्ष राहीले आहे. रस्त्यांचे सुध्दा सिमेंटीकरण करुन सोनी संगम पर्यंत रस्ता तयार झाला आहे. गावाचा सर्वांगिण विकास झाला आहे, असे जिल्हा परिषद अध्यक्ष रमेश डोंगरे सांगितले. यावेळी सरपंच कल्पना खंडाते यांचेही भाषण झाले. प्रारंभी सोनी व चप्राड येथील जलशुध्दीकरण केंद्र व जिल्हा परिषद शाळांच्या नवीन खोल्यांचे उदघाटन विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सोनी चप्राड येथील लोकप्रतिनिधी, अधिकारी , कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थितहोते.

Related Posts
Translate »