नेशन न्यूज मराठी टीम.
संभाजीनगर / प्रतिनिधी – सध्या मराठवाड्यामध्ये दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे सरकार लक्ष देत नाही. यामुळे आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने शेतकरी जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला. शेतकऱ्यांचे सर्व खरीप पीक हातातून निघून गेले आहे. मागील वर्षीचे अनुदान मिळालेले नाही. जर सरकारने या शेतकऱ्यांकडे जर लक्ष दिले नाही तर राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी सर्व शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहून याच महाराष्ट्रातून ,देशातून हाकलून दिल्याशिवाय राहणार नाही असा इशारा आंदोलकांनी दिला .
मागील वर्षी सरकारने आम्हाला आश्वासन दिले होते कि जो अग्रीम विमा आहे तो 21 दिवसाचा खंड पडल्यानंतर द्यावा लागतो तो अजूनही दिला नाही. एखाद्या वेळेस पेनाच्या रिफिल चा भाव कंट्रोल करून पहा हे लोक तुम्हाला जगू देणार नाही. कोणताही पक्ष असो त्याला शेतकऱ्यांशी काही देणं-घेणं नाही. पण पवार साहेब असे एकमेव व्यक्तिमत्व आहे जे शेतकऱ्यांच्या सदैव पाठीशी उभे आहेत. दुष्काळ लवकरात लवकर जाहीर करा अशी विनंती यावेळी करण्यात आली.



