महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
Default Image ठाणे लोकप्रिय बातम्या

ठाणे जिल्हापरिषदेच्या रानभाज्या महोत्सवाला उत्सुर्त प्रतिसाद

नेशन न्यूज मराठी टिम.

https://youtu.be/6VrM-HnBcUQ?si=kQT25yXzj9oBVk9C

ठाणे/संघर्ष गांगुर्डे – ठाणे जिल्हा परिषदेच्यावतीने रानभाज्या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून या महोत्सवामध्ये फक्त पावसाळ्यामध्ये येणाऱ्या रानभाज्या ठेवण्यात आल्या आहेत. या भाज्या तब्येतीसाठी गुणकारक असल्याचे देखील सांगितले जाते. यामध्ये सुमारे 25 ते 30 महिला बचत गटांनी आपले स्टॉल लावले असून या महोत्सवाला नागरिकांचा अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद येत आहे.

ग्रामीण भागात रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी व शहरी भागात रानभाज्याची विक्री करण्यासाठी रानभाज्या महोत्सव जिल्हा परिषद ठाणे येथिल आवारात आयोजित करण्यात आले होते. मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल याच्या हस्ते उद्घाटन व दिप प्रज्वलन करण्यात आले तसेच सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला वंदन करत या महोत्सवाची सुरुवात झाली. रानभाज्या महोत्सवात भिवंडी, शहापूर, मुरबाड, कल्याण, अंबरनाथ येथिल ग्रामीण भागातील एकूण ४० स्टॉल लावण्यात आले आहे. या महोत्सवात पावसाळ्यातील औषधी व गुणकारी रानभाज्या उपलब्ध असून आघाडा, शेवळा, कुलूची भाजी, भारंग, मायाळू, कपाळफोडी, दिंडा भाजी, करटोली, टाकळा इतर सर्व रानभाज्या विक्रीसाठी उपलब्ध होते.  

उमेदच्या महिलांना खुप शुभेच्छा. निसर्गाने आपल्याला जे दिलंय ते तुम्ही शहरी भागातील लोकांना देताय हे अतिशय महत्त्वाचे आहे. सध्याच्या काळात तरुण लोकांमध्ये हार्ट ॲटॅकचे प्रमाण वाढत आहे. सर्वांची प्रतिकारशक्ती कमी होत आहे कारण रोजच्या जेवणातील पोषण घटक कमी होत आहेत जावनशैली बदलत चाललेली आहे त्यामुळे प्रतिज्ञा करायला हवी की आठवड्यातून एक दिवस आपण रानभाज्या खायला हव्यात आणि आरोग्य सुधारण्यासाठी रानभाज्या लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी आपला उपक्रम महत्त्वाचं आहे असे प्रतिपादन मा. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी कार्यक्रमात केले आहे. 

उप मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे कार्यक्रम येथे असे सांगितले की सांगितले की मानवाच्या रक्ताच्या पेशी वाढवण्यासाठी रानभाज्या पुर्ण वर्षभरात केवळ पावसाळ्याच्या १-२ महिन्यात उपलब्ध होतात. त्याचा पुरेपूर वापर करून आपल्या आहारातील पोषणमूल्य उंचाऊन आपल्याला जास्तीत जास्त लाभ घेता येईल यासाठी महत्त्वाचे आहे. मा. प्रकल्प संचालक यांनी महिलांना या व्यवसायात उतरून वेगळी ओळख निर्माण करण्याचे आवाहन केले. 

यावेळी प्रकल्प संचालक छायादेवी शिसोदे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (साप्र) अविनाश फडतरे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (ग्राप) प्रमोद काळे, महिला बालकल्याण विभाग प्रमुख संजय बागुल, मोठ्या संख्येने उपस्थित महिला, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. 

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »