महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
Default Image लोकल बातम्या

महावितरणच्या वसई विभागात वीज चोरांविरुद्ध धडक कारवाई

नेशन न्यूज मराठी टीम.

वसई / प्रतिनिधी – महावितरणच्या वसई पूर्व उपविभागात व्यापक शोध मोहिमेत एकाच दिवसात ८४ वीज चोरांविरुद्ध धडक कारवाई करण्यात आली. या मोहिमेत १५ लाख ९ हजार ३०० रुपये किंमतीची ८० हजार ३७२ युनिट विजेची चोरी उघडकीस आणण्यात आली आहे.

महावितरणच्या १६ पथकांनी १७ ऑगस्टला धानीव बाग, पेल्हार, वाकणपाडा, शिवाजीनगर, वसई फाटा, सोपारा फाटा, दांगडेपाडा, जाधवपाडा, गावदेवी, धानीव भागात व्यापक शोध मोहिम राबवली. एकूण ७५७ वीज जोडण्यांची तपासणी यात करण्यात आली. त्यात ८४ जणांकडे विजेचा चोरटा वापर सुरू असल्याचे आढळले. त्यानुसार संबंधिताना चोरीच्या विजेचे देयक व तडजोडीची रक्कम भरण्याबाबत नोटिसा देण्यात आल्या आहेत. विहित मुदतीत या रकमेचा भरणा न करणाऱ्यांविरुद्ध वीज कायदा-२००३ च्या कलम १३५ अन्वये गुन्हा दाखल होण्यासाठी फिर्याद देण्यात येणार आहे. वीजचोरीच्या गुन्ह्यात जबर शिक्षा आणि दंडाची तरतूद असून कोणत्याही परिस्थितीत विजेचा अनधिकृत वापर टाळावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.

कल्याण परिमंडलाचे मुख्य अभियंता धनंजय औंढेकर व वसई मंडलाचे अधीक्षक अभियंता संजय खंडारे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकारी अभियंता प्रवीण सुटे, वसई पूर्वचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता गिरीश भगत, सहायक अभियंते सचिन येरगुडे, नितिन पाटील, निकुंज वैष्णव, कनिष्ठ अभियंता महेंद्र आघाव व त्यांच्या टिमने ही कारवाई केली

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »