महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
Default Image देश महत्वाच्या बातम्या

भारत एनसीएपी- नवीन कार मूल्यांकन कार्यक्रमाचा शुभारंभ

नेशन न्यूज मराठी टीम.

नवी दिल्ली / प्रतिनिधी – केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज नवी दिल्ली येथे भारत न्यू कार असेसमेंट प्रोग्राम (भारत एनसीएपी), या कार्यक्रमाची सुरुवात केली. हा कार्यक्रम नवीन कारच्या मूल्यांकनासाठी असून, भारतातील  3.5 टन वजना पर्यंतच्या वाहनांसाठी सुरक्षा मानकांची वाढ करून, रस्ते  सुरक्षा वाढवणे, हे या कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे.  उपस्थितांना संबोधित करताना ते म्हणाले की, सुरक्षित कार खरेदी करताना उत्तम निवड करण्यासाठी  ग्राहकांना सक्षम करण्याच्या दृष्टीने हे महत्वाचे पाउल आहे. 

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, भारत एनसीएपी कार्यक्रम भारतामधील वाहनांची सुरक्षा आणि गुणवत्तेला मोठी चालना देईल, आणि त्याच वेळी अधिकाधिक सुरक्षित वाहनांची निर्मिती करण्यासाठी वाहन निर्मात्यांमधील (OEMs) निकोप स्पर्धेला प्रोत्साहन देईल. ते म्हणाले की भारत एनसीएपी आणि AIS-197 अंतर्गत नवीन सुरक्षा व्यवस्था उत्पादक आणि ग्राहक दोघांच्याही फायद्याची आहे, त्याच बरोबर आपल्या नागरिकांचे जीवित रक्षण करण्यासाठी आणि आपल्या वाहन उद्योगाला जगातील पहिल्या क्रमांकाचे वाहन उत्पादन केंद्र बनवण्याच्या  दृष्टीने हे महत्वाचे पाउल आहे.    

हा कार्यक्रम 3.5T GVW पेक्षा कमी M1 श्रेणीतील परवाना प्राप्त मोटार गाड्यांसाठी लागू आहे. हा एक ऐच्छिक कार्यक्रम आहे.
हा कार्यक्रम 1 ऑक्टोबर 2023 पासून सुरू होईल आणि ऑटोमोटिव्ह इंडस्ट्री स्टँडर्ड (AIS). 197 वर आधारित असेल. स्पर्धात्मक सुरक्षा सुधारणांची परिसंस्था निर्माण करणे हे या कार्यक्रमाचे उद्दिष्ट असून, यामुळे ग्राहकांमध्ये जागरुकता वाढेल. वाहनाच्या कामगिरीचे क्रॅश चाचणीवर आधारित तुलनात्मक मूल्यांकन केल्यावर, उपलब्ध माहितीनुसार ग्राहक निर्णय घेऊ शकतील.

एनसीएपी ने वाहन उत्पादकांना जागतिक सुरक्षा मानकांची वाहने तयार करण्याची संधी दिली आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक संस्था (CIRT) हा कार्यक्रम राबवणार असून, लाभार्थींबरोबर सल्ला-मसलत केल्यानंतर तो विकसित करण्यात आला आहे.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »