नेशन न्यूज मराठी टीम.
अमरावती/प्रतिनिधी – आजचा बालक देशाच उद्याच भविष्य असे म्हंटले जाते पण एकंदरीत मेळघाट येथील बालकांच्या आरोग्याची स्थिती पाहता देशाच भविष्य हे कुपोषणाच्या विळख्यात अडकल्याचे दिसून येत आहे, त्याच बरोबर राज्याच्या सरकारी यंत्रणांचा फोलपणा या निमित्ताने समोर येत आहे.राजकीय शासकिय कार्यक्रम सोहळ्यात करोडो रुपयांचा चुराडा होतो. गरिबांच्या मुलांना मात्र खाण्यावाचून मरणाची वाट बघावी लागताना दिसत आहे.
अमरावती जिल्ह्यात महिला व बाल विकास विभागामार्फत कुपोषण मुक्तीसाठी विविध उपाययोजना राबवण्यात येत असल्या तरी मेळघाटातील धारणी व चिखलदरा तालुक्यात 234 बालके (सॅम) अतितीव्र कुपोषित असल्याचे आढळून आले,त्याच बरोबर मध्यम कमी वजनाची २२३४ त्याच बरोबर एकदम कमी बजनाची ४००० बालक असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याचा अर्थ सरकार देशाच्या उद्याची भविष्य असणार्या बालकांना आरोग्य सेवा पुरविण्यात कमी पडत आहे का? सरकारी यंत्रणा कुचकामी ठरत आहेत का? असे एक नाही तर हजार प्रश्न या निमिताने निर्माण होताना दिसत आहे.
या बालकांवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहे,मेळघाटातील कुपोषण कमी करण्यासाठी विशेष बाब म्हणून पेसाचा निधीमधून 4 हजार कमी वजनांच्या बालकांसाठी ग्राम बाल विकास केंद्र सुरू करण्यात येत असून त्यामुळे बालके कुपोषित होण्यापासून वाचविण्यासाठी मदत होणार आहे.अतितीव्र कुपोषित 234 (सॅम) बालकांना जिल्ह्यात कार्यरत असलेल्या ग्राम बालविकास केंद्रामध्ये दाखल करून घेतले जाते. काही पालकांना पीएचसीमधील बाल उपचार केंद्रात दाखल करून त्यांच्यावरही औषधोउपचार उपचार तसेच पूरक पोषण आहार दिला जात असल्याची माहिती महिला व बालकल्याण विभागाचे डेप्युटी सीईओ डॉ.कैलास घोडके यांनी अशी माहिती दिली आहे.
सरकार व येथील लोकप्रतिनिधी हा प्रश्न गाभिर्याने घेऊन कुपोषणाचा प्रश्न सोडविला पाहिजे नाहीतर आपल्या जिल्हातील आपल्या मतदार संघात कुपोषणग्रस्त बालकांची आकडेवारी एवढी मोठी आहे हि बाब त्यांच्यासाठी लाजीरवानी गोष्ट असणार आहे.



