महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
Default Image क्रिडा

महावितरण अधिकाऱ्यांमध्ये रंगला प्रदर्शनीय क्रिकेट सामना

नेशन न्यूज मराठी टीम.

मुंबई/प्रतिनिधी – महावितरणच्या राज्यस्तरीय आंतरपरिमंडलीय क्रीडा स्पर्धा नुकत्याच जळगावात मोठ्या उत्साहात पार पडल्या. या स्पर्धेदरम्यान महावितरणचे सांघिक कार्यालय तसेच कोकण प्रादे‍शिक कार्यक्षेत्रातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या संघांत शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेला प्रदर्शनीय क्रिकेट सामना बरोबरीत सुटला. 

मैत्रीपूर्ण सामन्यात सांघिक कार्यालयाचे नेतृत्व संचालक (प्रकल्प तथा मानव संसाधन) प्रसाद रेशमे यांनी तर कोकण प्रादे‍शिक संघाचे नेतृत्व सहव्यवस्थापकीय संचालक चंद्रकांत डांगे यांनी केले. कोकण संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत निर्धारित 12 षटकांत 3 बाद 113 धावा केल्या. मुख्य अभियंता धनंजय औंढेकर यांनी 7, कार्यकारी अभियंता संदीप शेंडगे यांनी 10, सहव्यवस्थापकीय संचालक चंद्रकांत डांगे यांनी 4, व्यवस्थापक (वित्त व लेखा) योगेश अमृतकर यांनी 10, जनसंपर्क अधिकारी ज्ञानेश्वर आर्दड यांनी 8, सहायक महाव्यवस्थापक (मानव संसाधन) वैभव थोरात यांनी 2 व अधीक्षक अभियंता इब्राहिम मुलाणी यांनी 7 धावा काढून धावसंख्या वाढवण्यास मदत केली. 12 धावा अतिरिक्त निघाल्या

प्रत्युत्तरात सांघिक कार्यालयाने सलामीवीर प्रसाद महातोळे (कार्यकारी अभियंता) यांच्या नाबाद 46 धावांच्या जोरावर विजयासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. सांघिक कार्यालयास शेवटच्या षटकांत 13 धावांची गरज होती. पहिल्या 5 चेंडूत 1‍0 धावा निघाल्या. शेवटच्या चेंडूवर 3 धावांचे लक्ष्य असताना 2 धावा निघाल्याने रोमहर्षक अवस्थेत अखेर सामना बरोबरीत सुटला. सांघिक कार्यालयाच्या वतीने महाव्यवस्थापक (मानव संसाधन) राजेंद्र पांडे यांनी 18, संचालक (प्रकल्प तथा मानव संसाधन) प्रसाद रेशमे यांनी 7, कार्यकारी अभियंता चेतन वाडे यांनी 14, मुख्य अभियंता भुजंग खंदारे यांनी 10, कार्यकारी अभियंता धीरज चव्हाण यांनी 8 तर प्रणाली विश्लेषक विक्रांत इंगळे यांनी 2 धावा काढल्या.

सांघिक कार्यालयाच्या वतीने कार्यकारी संचालक (वि‍तरण तथा मानव संसाधन‍) अरविंद भादीकर, मुख्य अभियंता प्रवीणकुमार परदेशी, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकांचे विशेष कार्य अधिकारी मंगेश कोहाट, अधीक्षक अभियंता स्वप्नील काटकर, प्रणाली विश्लेषक संतोष डोंबाळे, उपविधी अधिकारी सुमेध कोलते, कार्यकारी अभियंता योगेश वारके, कार्यकारी अभियंता नीलेश सोनगिरे व कार्यकारी अभियंता ओम भेंडे यांनीही सामन्यात सहभाग घेतला. तर कोकण प्रादे‍शिक संघातर्फे मुख्य अभियंता सुनील काकडे, मुख्य महाव्यवस्थापक (प्रशिक्षण व सुरक्षा) देवेंद्र सायनेकर, उपमुख्य औद्योगिक संबंध ‍अधिकारी प्रमोद राजेभोसले, अप्पासाहेब पाटील, कार्यकारी अभियंता अनिल थोरात, विशाल ‍शिवतरे, रामचंद्र चव्हाण, धनराज बिक्कड, कैलास लव्हेकर, अनिल महाजन, धनंजय आहेर, व्यवस्थापक (मानव संसाधन) योगेश्वर पाडवी यांनी सामन्यात सहभाग नोंदवला.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »