महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
बिझनेस

नाभिक समाजासाठी ॲड प्रकाश आंबेडकर यांचा पुढाकार जिल्हाधिकाऱ्यांची घेतली भेट; दुकाने न उघडू दिल्यास आंदोलनाचा इशारा

प्रतिनिधी.

अकोला : सध्या लॉकडाउनच्या काळात अनेकांचे व्यवसाय व रोजगार बंद पडले आहे. नाभिक समाजाला त्याची सर्वात जास्त झळ पोहचत आहे. सध्या जवळपास सर्वच दुकानांना उघडण्याची परवानगी देण्यात आलेली आहे परंतु केशकर्तनालय, ब्युटिपार्लर यांना मात्र परवानगी देण्यात आली नाही. यामुळे अकोला जिल्ह्यातील नाभिक समाजावर उपासमारीची वेळ आली आहे. या अनुषंगाने आज वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड प्रकाश आंबेडकर यांनी नाभिक समाजाच्या प्रतिनिधी सोबत जिल्हाधिकारी यांची भेट घेउन जिल्ह्यातील केशकर्तनालय ब्युटी पार्लर सुरू करण्यासाठी चर्चा केली.

यावेळी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने केशकर्तनालाय सुरू करण्याचा दिलेल्या परवानगीच्या धरतीवर अकोला जिल्ह्यातीलही सर्व केशकर्तनालय व ब्युटि पार्लर उघडण्याची परवानगी द्यावी असे सुचविले.
नाभिक समाज या लॉकडाउनमुळे विपन्नावस्थेत आला असून अकोट येथे उपासमारी व आर्थिक विवंचनेतून आत्महत्या देखील झाली आहे. याकडे प्रशासनाचे लक्ष वेधले. सदर समस्येतून बाहेर पडण्यासाठी नाभिक समाजाला तात्काळ दुकाने उघडण्याची परवानगी देण्यात यावी, तसेच तोपर्यंत नाभिक समाजातील लोकांना मोफत अन्नधान्य व आर्थिक मदत करावी अशी आग्रही भुमिका ॲड बाळासाहेब आंबेडकर यांनी मांडली.

अन्यथा लवकरच नाभिक समाज रस्त्यावर उतरून व्यवसाय करतील असा इशारा त्यांनी दिला. यावेळी जिल्हाधिकारी यांनी सकारात्मक प्रतिसाद देत येत्या आठ दिवसात यावर निर्णय घेण्यासंदर्भात मान्य केले. तसेच याप्रसंगी बाळापूरमधील करोनाग्रस्त भागातील आरोग्य तपासणी करिता वंचीततर्फे डॉक्टर उपलब्ध करून देण्याचा मानस ऍड बाळासाहेब आंबेडकर व्यक्त केला. ज्याचे जिल्हाधिकारी यांनी स्वागत केले.

याप्रसंगी प्रदेश प्रवक्ता डॉ धैर्यवर्धन पुंडकर, जिल्हाध्यक्ष प्रदिप वानखडे, जिल्हा प्रसिद्धीप्रमुख डॉ प्रसन्नजित गवई, युवा नेता पराग गवई, नाभिक समाजाचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर इंदुरकर, प्रशांत भातखडे, गजानन ओलोकार, संतोष पंडित, हरीहर पळसकर, गजानन येवतकर उपस्थित होते.

Related Posts
Translate »