महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
Default Image इतर ताज्या घडामोडी

चंद्रपूर येथे मत्स्यपालन प्रादेशिक संशोधन केंद्र उभारावे – मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची मागणी

  नेशन न्यूज मराठी नेटवर्क.

नवी दिल्ली/प्रतिनिधी – महाराष्ट्रात गोड्या पाण्यातील मासेमारी मोठ्या प्रमाणात होते. त्यातही विदर्भात हे प्रमाण अधिक आहे. या पार्श्वभूमीवर चंद्रपूर येथे मत्स्यपालन प्रादेशिक संशोधन केंद्र उभारावे, अशी मागणी महाराष्ट्राचे मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे.

केंद्रीय मंत्री रूपाला यांच्या अध्यक्षतेखाली सागर परिक्रमा योजनेची आढावा बैठक सोमवारी घेण्यात आली. त्या बैठकीत मंत्री मुनगंटीवार यांनी केंद्रीय मंत्र्यांना निवेदन देवून वरील मागणी केली.

विदर्भात तळी, मालगुजरी तळी, शेत तळी आदी असे एकूण 30,650 तळी आहेत. यात 1, लाख 87 हजार 249 हेक्टर  पाण्याचे क्षेत्र आहे. यातील 50  टक्के तळ्यात मासेमारी केली जाते.

चंद्रपूर जिल्ह्यातील पूर्व आणि दक्षिण सीमेला वैनगंगा आहे, तर पश्चिम सीमेला वर्धा नदी आहे. याठिकाणी 5,547 जल समिती (वॉटर बॉडीज) असून 25,429 हेक्टर पाणी क्षेत्र आहे. यामधील  29 टक्के तळी मत्स्यव्यवसायासाठी वापरले जातात तर 20 टक्के तळी हे शेत तळे  आहेत.

देशातील इतर भागात ज्याप्रमाणे गोड्या पाण्यातील मत्स्यपालन प्रादेशिक संशोधन केंद्रे उभारली आहेत, त्याच धर्तीवर चंद्रपूरमध्येही संशोधन केंद्र उभारण्यात यावे. यामुळे गोड्या पाण्यातील मत्स्य व्यवसायाचा जलदगतीने विकास होऊ शकेल. मत्‍स्य बीजपुरवठा, अद्ययावत तंत्रज्ञानाची माहिती ही प्रशिक्षणाद्वारे देऊन कौशल्य विकास करता येईल.

शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी मत्स्यव्यवसाय पूरकव्यवसाय म्हणून अधिक उपयोगी ठरत आहे. विदर्भात मत्स्यबीज समूह केंद्राला (फिश सीड क्लस्टर) संधी आहे. भारतीय कृषी संशोधन परिषद (ICAR) आणि महाराष्ट्र पशुसंवर्धन आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूरच्या समन्वयाने चंद्रपूर येथे  प्रादेशिक संशोधन केंद्र उभारावे, अशी मागणी निवेदनात नमूद आहे.

                                             

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »